घरठाणे"बेकायदेशीर सरकारवर बुलडोझर फिरवण्याची आवश्यकता...", मुंब्य्रातील घटनेने संजय राऊत संतापले

“बेकायदेशीर सरकारवर बुलडोझर फिरवण्याची आवश्यकता…”, मुंब्य्रातील घटनेने संजय राऊत संतापले

Subscribe

मुंब्य्राच्या कौसा येथील संजयनगरमध्ये असलेल्या शिवसेना शाखेवर काल (ता. 07 नोव्हेंबर) बुलडोजर फिरवण्यात आला. यामुळे आता ठाकरे गट वि. शिंदे गटात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

मुंबई : मुंब्य्राच्या कौसा येथील संजयनगरमध्ये असलेल्या शिवसेना शाखेवर काल (ता. 07 नोव्हेंबर) बुलडोझर फिरवण्यात आला. यामुळे आता ठाकरे गट वि. शिंदे गटात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. तर शाखा तोडल्याचा हा वाद आता चिघळण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही शाखा शिवसेना ठाकरे गटाची असल्याने आता उद्धव ठाकरे हे पक्षाच्या इतर नेत्यांसह शनिवारी 11 तारखेला मुंब्य्राच्या शाखेला भेट देणार आहेत. 2 नोव्हेंबरला मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवला, अशी माहिती देण्यात आलेली आहे. परंतु, या प्रकरणावरून आता ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. शाखांवर बुलडोजर चालवणाऱ्या बेकायदेशीर सरकारवर बुलडोझर फिरवण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. (Sanjay Raut was furious after bulldozer turned on Thackeray group branch in Mumbra)

हेही वाचा – नीरव मोदीसाठी आर्थर रोड कारागृहात बनविण्यात आली विशेष बॅरेक, पण…; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

- Advertisement -

आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यात सध्या पुर्णपणे बेकायदेशीर सरकार चालवले जात आहे. त्या सरकारवर बुलडोझर फिरवण्याची आवश्यकता आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून घटनाबाह्य आहेत. त्यांचा सरकारचा डोलारा मग त्यात अजित पवार असुद्यात किंवा अन्य कोणी असुद्यात हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात काम करत आहे. या घटनाबाह्य सरकारवर कायदेशीरदृष्ट्या बुलडोझर, जेसीबी फिरवण्याची गरज असताना या घटनाबाह्य सरकारचे गुंड आणि माफिया शिवसेनेच्या शाखांवर बुलडोझर फिरवत आहेत. ज्या शाखा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केल्या. ज्या शाखांमध्ये आजही निष्ठावंत शिवसैनिक बसतो. ज्या शाखांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लागले आहेत. तिकडे ते जम्मु-काश्मिरमध्ये जाऊन शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करून नौटंकी करत आहेत आणि इथे ठाण्यात त्यांच्या भागामध्ये अशा गोष्टी घडत आहेत, महाराष्ट्रात काय मोघलाई सुरू आहे का? असे म्हणत राऊतांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच, ठाण्यात नेमके हे का सुरू आहे? शाखा का तोडण्यात येत आहे. असे काही तरी करण्याची यांची हिंमत फक्त ठाण्यातच होते, असे सांगत राऊत म्हणाले की, 11 तारखेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक हे मुंब्य्रात जी शाखा तोडण्यात आली, तिथे जाणार आहोत. शिवसैनिकांना आणि तिथल्या लोकांना भेटणार आहोत. त्यावेळी त्यांनी तिथे बुलडोझर घेऊन यावा, असे आव्हान संजय राऊत यांच्याकडून करण्यात आले आहे. गृहमंत्री काय करत आहेत? हे कायद्याचे राज्य आहे का? असे प्रश्न देखील राऊतांकडून उपस्थित करण्यात आले.

- Advertisement -

आज तुमच्या हातात सत्ता आहे, जरी ती घटनाबाह्य असली तरी. पण माझे पोलिसांना आव्हान आहे. तुमचाही हिशोब होईल. ज्यांनी बुलडोझर पुरविला त्या मनपाच्या अधिकाऱ्यांना माझे आव्हान आहे की 2024 नंतर तुमचाही हिशोब होईल, याला तुम्ही धमकी म्हणा किंवा इशारा म्हणा काहीही म्हणू शकता. ज्याप्रमाणे शाखेवर बुलडोजर फिरवला आहे त्याची नोंद शिवसैनिकांनी केली आहे, असा थेट इशारा संजय राऊत यांच्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -