स्वॅब टेस्टला पर्याय असलेल्या ‘सलाइन गार्गल टेस्ट’ला ICMRची मान्यता

स्वॅब टेस्टला पर्याय असलेल्या ‘सलाइन गार्गल टेस्ट’ला ICMRची मान्यता

कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याचे निदान करण्यासाठी आपल्याकडे अँटीजेन टेस्ट आणि आरटीपीआर टेस्ट केली जाते. त्यातील आरटीपीसीआर टेस्ट ही सर्वात महत्त्वाची आणि योग्य समजली जाते. मात्र आता स्वॅब टेस्टसाठी पर्यायी टेस्ट म्हणून सलाइन गार्गल टेस्टला (saline gargle test ) भारतीय संशोधन वैद्यकीय परिषदेने म्हणजेच ICMRने मान्यता दिली आहे. RT-PCR टेस्टसाठी नाकातून स्वॅब घ्यावा लागतो. बऱ्याचदा ही प्रक्रिया त्रासदायक ठरते. गार्गल टेस्टच्या या नव्या तंत्रज्ञान टेस्ट करताना कोणताही त्रास होणार नाही. नागपुर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (NERI) संशोधक डॉ. कृष्णा खैरनार यांनी सलाइन गार्गल टेस्ट विकसित केली आहे. या टेस्टमध्ये गार्गल म्हणजेच सोप्या भाषेत गुळण्या करायच्या आहेत. ही सलाइन लार्गल टेस्ट आपण स्वत: करु शकतो. टेस्ट करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. या टेस्टमधून RT-PCRटेस्ट पेक्षा चांगले नमुने मिळू शकतात,असे कृष्णा खैरनार यांनी म्हटले आहे.

सर्दी सारख्या साध्या आजारावर गुळण्या करणे प्रभावी ठरते. तर गुळण्यांचा वापर RT-PCR टेस्ट का करता येऊ नये असा विचार करुन डॉ. खैरनार यांनी हे संशोधन सुरु केले होते. अखेर त्यांच्या संशोधनाला यश आले आहे. डॉ. कृष्णा खैरनार यांनी सांगितल्यानुसार, गार्गल टेस्ट ही स्वॅब कलेक्शन सेंटरच्या बाहेर उभे राहून कोणीही आपल्या हाताने करु शकतात. ट्यूबमध्ये टेस्ट केलेला नमुना गोळा करायचा आणि प्रयोगशाळेत RT-PCR तपासण्यासाठी द्यावा. यात कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही.

सलाइन गार्गल टेस्ट करायची कशी?

सलाइन गार्गल टेस्ट केल्यानंतर प्रयोगशाळेत त्याची चाचणी केली जाईल. सलाइन गार्गलमधून आणलेला नमूना प्रयोगशाळेतील एका खास केमिकलमध्ये मिसळला जाईल. त्यानंतर त्याला ३० मिनिटांपर्यंत रुम टेम्प्रेचरला ठेवण्यात येईल. पुढे ९८ डिग्री तापमानात त्याला ६ मिनिटांसाठी गरम करण्यात येईल. यामुळे हा नमुना RT-PCR टेस्टसाठी वापरण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे हा RT-PCR टेस्टचे नमुने प्रयोगशाळेत गेल्यानंतर त्यातून RNA काढला जातो. मात्र गार्गल टेस्टमध्ये RNA न काढताच RT-PCR टेस्ट करता येणार आहे. त्यामुळे वेळ आणि पैसे वाचणार आहेत.

गार्गल टेस्टचे फायदे

या टेस्टसाठी कोणतेही प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही. या टेस्टसाठी केवळ गार्गल करायचे आहे त्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. कोरोना चाचण्या जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना टेस्टिंग सेंटवरील गर्दी कमी होईल.

ICMR कडूव कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांना यांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करावी असे आम्हाला सांगण्यात आले आहे,असे डॉ.खैरनार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता टेस्टसाठी जाताना कोणतीही भिती मनात ठेवू जाऊ नका. कारण येत्या काळात कोरोनाचे निदान करण्यासाठी सालाइन गार्गल टेस्ट करता येणार आहे.  मुख्य म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत या गार्गल टेस्ट सर्वात मोठा उपयोग होणार आहे, असे संशोधक डॉ. खैरनार यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – Covid-19: जुलैपर्यंत दुसऱ्या लाटेचा कहर संपणार, येत्या ६-८ महिन्यात येणार तिसरी लाट!

 

 

First Published on: May 20, 2021 6:32 PM
Exit mobile version