घरदेश-विदेशCovid-19: जुलैपर्यंत दुसऱ्या लाटेचा कहर संपणार, येत्या ६-८ महिन्यात येणार तिसरी लाट!

Covid-19: जुलैपर्यंत दुसऱ्या लाटेचा कहर संपणार, येत्या ६-८ महिन्यात येणार तिसरी लाट!

Subscribe

देशात सध्या कोरोनाचा कहर सुरू असून सर्वच कोरोनाने चिंतेत आहे. या दरम्यान, भारतातील कोरोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत संपरणार आणि साधारण सहा ते आठ महिन्यांत या महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन सदस्यीय समितीने हा अंदाज व्यक्त केला असून भारत सरकारला सतर्क केले गेले आहे. SUTRA मॉडेलचा वापर करून शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, दिवसाला अंदाजे १.५ दशलक्ष नवीन रुग्ण मेच्या अखेरीस आढळतील आणि जूनच्या शेवटी २० हजार रूग्णांची नोंद करण्यात येईल. यासह जुलै पर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपणार असून येत्या ६-८ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्यची शक्यता आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्किम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा आणि दिल्ली आणि गोव्यासारख्या राज्यांत कोरोनाने रुग्ण संख्येचा आलेख उंचावलेला आहे, तसेत तमिळनाडूमध्ये २९ ते ३१ मे आणि पद्दुचेरीमध्ये १९-२० मेमध्ये कोरोनाची संख्या सर्वाधिक असण्याची शक्यता आहे, असे पॅनेलचे सदस्य आणि आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

असेही सांगितले जात आहे की, पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांत अद्याप कोरोनाची स्थिती साधारण आहे. आसाम २०-२१ मे, मेघालयात ३० मे, त्रिपुरामध्ये २६-२७ मेपर्यंत कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असू शकते. यासह हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सध्या कोरोना बाधितांमध्ये वाढ नसली तरी हिमाचल प्रदेशात २४ मेपर्यंत आणि पंजाबमध्ये २२ मेपर्यंत कोरोना बाधितांचा आलेख उंचावण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सहा ते आठ महिन्यांत कोरोनाती तिसरी लाट येणे अपेक्षित आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीकरण झाल्यामुळे बरेच लोक बाधित होणार नाहीत. तसेच किमान ऑक्टोबर २०२१ पर्यंत तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -