‘मुंबई मॉडेल’ यशस्वी होतं तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का? मनसेचा सवाल

‘मुंबई मॉडेल’ यशस्वी होतं तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का? मनसेचा सवाल

राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. ५ टप्प्यांमध्ये राज्यात अनलॉक केलं जाणार आहे. या पाच टप्प्यांमध्ये मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. यावरून मनसेने सवाल उपस्थित केला आहे. तसंच शिवसेना आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “मुंबई मॉडेलचं कौतुक करणारे तोंडावर आपटले आहेत. जर मुंबई मॉडेल यशस्वी होते तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का?” असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

राज्य सरकारच्या निकषानुसार मुंबई तिसऱ्या टप्प्यात – महापौर

मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुपटीचं प्रमाण 515 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला दोन आठवड्यांची आकडेवारी पाहता मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत आहे. ज्यामुळं मुंबई ही तिसऱ्या लेवलपर्यंत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या काळात पहिल्या आठवड्यात मुंबईत तिसऱ्या टप्प्यावर असली तरीही येत्या काळात मुंबई पॉझिटीव्हिटी रेटमध्ये दुसऱ्या टप्प्यात आल्यास त्यानुसार नियम लागू केले जाती. मुख्यमंत्री कार्यालय किंवा खुद्द मुख्यमंत्री काही वेळात याबाबतच्या सूचना जाहीर करतील असं महापौर म्हणाल्या.

 

First Published on: June 5, 2021 12:56 PM
Exit mobile version