“…’हा’ सिनेमा टॅक्स फ्री करून दाखवा”, जितेंद्र आव्हाडांचे राज्य सरकारला आव्हान

“…’हा’ सिनेमा टॅक्स फ्री करून दाखवा”, जितेंद्र आव्हाडांचे राज्य सरकारला आव्हान

मुंबई | “आम्ही शाहिरांचे सिनेमे दाखवून प्रेम, संस्कृती पसरवू हिम्मत असेल तर महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा टॅक्स फ्री करून दाखवा”, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीटद्वारे राज्य सरकारला केले आहे. देशात ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमावरून वाद सुरू आहे. या सिनेमावरून देशभरात राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात देखील द केरल स्टोरी सिनेमा टॅक्स फ्री दाखवण्याची मागणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “तुम्ही द्वेषाचे सिनेमे दाखवून द्वेष पसरवा; आम्ही शाहिरांचे सिनेमे दाखवून प्रेम, संस्कृती पसरवू हिम्मत असेल तर हा सिनेमा टॅक्स फ्री करून दाखवा”, असे ट्वीट केले असून या ट्वीटमध्ये #महाराष्ट्रदेशा #जयमहाराष्ट्र #महाराष्ट्रशाहीर हे हॅशटॅग वापरले आहेत. या सिनेमाचे दोन फोटो ट्वीटमध्ये आहेत. 

‘द केरल स्टोरी’ हा सिनेमा देशभरात चांगला कमाई करत आहेत. हा सिनेमा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये टॅक्स फ्री दाखवण्यात येणार आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शाहीर सिनेमा मोफत दाखवण्याचे आवाहन जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारला केले आहे. बंगालमध्ये द केरल स्टोरी हा सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे तर, सिनेमा असोसिएशन तामिळनाडूमध्ये हा सिनेमा दाखवण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा – दुर्दैव… ‘महाराष्ट्र शाहीर’ऐवजी ‘द केरला स्टोरी’ला राजकीय पाठिंबा, दिग्दर्शकांकडून नाराजी व्यक्त

केदार शिंदेंची खंत

महाराष्ट्र शाहीर सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज्यातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील नेते द केरल स्टोरी सिनेमा ट्रॅक्स फ्री दाखवण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर केदार शिंदेंनी ट्वीट करत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. केदार शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हटले की, “दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?”

 

 

First Published on: May 10, 2023 12:34 PM
Exit mobile version