साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

मराठवाडा आणि विदर्भ भूकंपाच्या धक्क्याने हादरले

साताऱ्यात आज सकाळी भूकंपाचे अचानक सौम्य धक्के बसले. गुरुवारी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती एएनआयने दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.८ इतकी होती. तर या भूकंपाचा केंद्रबिंदू नक्की कुठे होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचप्रमाणे या भूकंपाबाबत अद्याप कोणतीही जीवित किंवा आर्थिक हानी झाल्याचे वृत्त आलेले नाही.

या भूकंपाचा केंद्रबिंदू कोकणातील देवरुख गावच्या पूर्वेला ७ किलोमीटर अंतरावर तर कोयना धरणापासून तो ३२ किलोमीटर अंतरावर होता. हा भूकंप कोयना पाटणसह पोफळी, अलोरे, चिपळूण आणि कोकणातील अनेक विभाग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाणवला. या भूकंपात कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती शासकीय सुत्रांनी दिली.

First Published on: June 20, 2019 9:35 AM
Exit mobile version