आता पुणेकरांना हेल्मेट घालावेच लागणार!

आता पुणेकरांना हेल्मेट घालावेच लागणार!

फोटो प्रातिनिधीक आहे

पुण्यात १ जानेवारी २०१९ पासून हेल्मेटसक्ती या कायद्याची अंमलबजावणी सुरु होणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी दिली आहे. हेल्मेटसक्तीसाठी वेंकटेशम यांनी जनजागृती सुरु केली आहे. पुण्यात वाढती वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या आहे. या वाहतूक कोंडीत अनेक अपघातही होत आहेत. अशा अपघातांमध्ये हेल्मट न घालणाऱ्या चालकांचा अनेकवेळा मृत्यूहूी झाला आहे. त्यामुळे या घटना टाळता यावा आणि चालकांचा जीव वाचावा यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. शिवाय, प्रशासन यासाठी कडक कारवाईही सुरु करणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.

हेही वाचा – पुण्याचे सिंघम पोलीस आणि वाहतूक कोंडीवर जालीम उपाय!

पुणेकरांनी केला होता विरोध

याअगोदरही पुण्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी पुण्याच्या वाहतूक शाखेने हेल्मेटसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली होती. परंतु, त्यावेळी पुणेकरांनी या अंमलबजावणीला नकारात्मक प्रतिसाद दिला होता. पुण्यातील वेगवेगळ्या संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन या अंमलबजावणीचा विरोध केला होता. त्यामुळे आताही या अंमलबजावणीला पुणेकर कितपत सकारात्मक प्रतिसाद देतात यावर साशंक्ता आहे. वाढती वाहतूक कोंडीवर तोडगा काढवा अशी विनंती काही पुणेकरांनी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्याकडे केली होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत चालावी यासाठी अंमलबजावणी सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.


हेही वाचा – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

First Published on: November 16, 2018 6:01 PM
Exit mobile version