घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

Subscribe

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. एक्स्प्रेस वेवर जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गुरुवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील गणेशभक्त गावाकडे जातात. मुंबईहून पुण्याकडे आणि कोकणात गणपती उत्सवासाठी जाणा-या प्रवाशांची संख्या मोठी असते. गणेशोत्सव एका दिवसावर येऊन ठेपल्याने सर्वच गणेशभक्त आता सणासाठी गावाकडे निघाले आहेत. एकीकडे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे. तर दुसरीकडे  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर देखील पुण्याकडे जाणाऱ्यांची गर्दी झाली आहे. अमृतांजन पुल आणि बोरघाटामध्ये मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -