दुर्गप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ गडावर रात्रीच्या मुक्कामास बंदी

दुर्गप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ गडावर रात्रीच्या मुक्कामास बंदी

Rajgad Fort pune

Night stay at rajgad fort is prohibited | पुणे – दुर्गप्रेमी आणि गडकिल्ले संवर्धन करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील राजगड किल्ल्यावर रात्री मुक्कामासाठी जाणाऱ्यांवर पुरातत्व विभागाने पाबंद घातला आहे. गडावर स्वच्छता ठेवण्याच्या उद्देशाने पुरातत्व विभागाने राजगड किल्ल्यावर रात्री मुक्कामाला बंदी घातली आहे. याबाबतचे शासकीय परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (Night stay at rajgad fort is prohibited)

अनेक गिर्यरोहक, दुर्गप्रेमी आणि पर्यटक राजगडावर मुक्कामासाठी जातात. मात्र, मुक्कामावेळी पर्यटकांकडून कचरा केला जातो. अन्न शिजवण्यासाठी चूल पेटवली जाते. यामुळे गडावर अस्वच्छता वाढली आहे. ही अस्वच्छता रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने रात्रीच्या मुक्कामावर बंदी आणली आहे. यासंदर्भातील पत्र भोर उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा – गडकिल्ले संवर्धन करणे काळाची गरज – कैलास घरत

राजगड किल्यावर अनेक पर्यटक रात्रीच्या मुक्कामाला येत असतात. या पर्यटकांकडून चूल पेटवून परिसरात कचरा टाकला जात असल्याच्या अनेक घटना पुढे आल्याने या गडावरील पर्यटकांचा रात्रीचा मुक्काम हा बंद करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहणे यांनी दिली. मात्र, या निर्णयाविरोधात सह्याद्री ट्रेकर्सने निषेध व्यक्त केला आहे.

शासकीय नियमाखाली हा आदेश काढला असेल पण, असे किती शासकीय नियम किल्ल्यांबाबत पाळता, असा सवालही यावेळी विचारण्यात आला. काल परवाच राजगड केलेल्या चुकीच्या कामामुळे खूप मोठं रामायण झालं आहे. त्याचा तर बदला नाही ना घेत तुम्ही. अशी बरीच कामे अगोदरच तुम्हीच गडावर केली आहेत. आता तुम्ही कसल्या काळजीपोटी गड मुक्कामास बंद करणार आहात?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – किल्ले रायगडावर १५, १६ एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन

First Published on: February 16, 2023 12:06 PM
Exit mobile version