नोव्हेंबरमध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढणार

नोव्हेंबरमध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढणार

नोव्हेंबर महिना आला की सर्वांनाच थंडीची चाहूल लागते. कपाटात ठेवलेले उबदार कपडेसुद्धा बाहेर येतात. यावर्षी पावसाने मुंबईसह महाराष्ट्राला झोडपून काढले. पण आता पासून गेल्याने थंडीचा कडका देखील वाढणार आहे. नोव्हेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा किमान तापमान खाली घसरणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी थंडीमुळे कुडकुडी भरणार आहे.

दरम्यान नोव्हेंबर महिन्यात धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांमध्ये प्रतिवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच जवळपास पाऊस पडण्याची शक्यता नाही. सोलापूर आणि उर्वरित मराठवाड्यासह संपूर्ण विदर्भामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये प्रतिवर्षीच्या
तुलनेत नोव्हेंबरमधील सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाष्ट्रात दुपारचे तापमान उबदार असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर व विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांत पहाटे 5 वाजता किमान तापमान तर नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी असणाऱ्या सरासरी किमान तापमानापेक्षा कमी तापमान असण्याची शक्यता आहे.

महराष्ट्रात येत्या आठवड्यात पावसाचा कोणताच इशारा नाही. तर ईशान्येकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील आठव्ड्यात महाराष्ट्रात कमी – अधिक प्रमाणात थंडी असणार आहे. असे हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे म्हणाले.


हे ही वाचा –   आदित्य ठाकरेंच्या सिल्लोडमधील सभेला परवानगी; ‘या’ ठिकाणी होणार सभा

First Published on: November 5, 2022 10:25 AM
Exit mobile version