ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप पहिल्या क्रमांकावर, जनतेची नव्या सरकारला पसंती – चंद्रशेखर बावनकुळे

ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप पहिल्या क्रमांकावर, जनतेची नव्या सरकारला पसंती – चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध 889 ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक 397 ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी (bjp) पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज 17 ऑक्टोबर रोजी सांगितले.

याच दरम्यान बावनकुळे म्हणाले, सोमवारी मतमोजणीनंतर जिल्ह्याजिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना युतीला एकूण 478 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला असून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना एकूण मिळालेल्या 299 ग्रामपंचायतींपेक्षा युतीचे संख्याबळ खूप जास्त आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने नव्या सरकारला आणि भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल दिला आहे. त्याबद्दल मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंद करतो. असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. त्यांच्या विकासाच्या कामगिरीला जनतेची पुनःपुन्हा पसंती मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही हेच दिसून आले आहे.


हे ही वाचा –  ‘मी तेव्हा निवडणूक जिंकलो असतो’… काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा

First Published on: October 17, 2022 8:08 PM
Exit mobile version