धनुष्यबाण कोणाच्या हाती.. दसऱ्याच्या मुहूर्तावर निवडणूक आयोगासमोर ठाकरे मांडणार आपली भूमिका

धनुष्यबाण कोणाच्या हाती.. दसऱ्याच्या मुहूर्तावर निवडणूक आयोगासमोर ठाकरे मांडणार आपली भूमिका

राज्यात या प्रमाणे सत्ता संघर्ष सुरु आहे त्याने राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. शिवसेनेच्या(shivdena) चिन्हाचा सुरु असलेला वाद हा सर्वश्रुत आहे. सध्या हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारी आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला 5 ओक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत धनुष्यबाण चिन्हाबाबत शिवसेनेला आपली बाजू मांडावी लागणार आहे. अशातच राज्यात बुधवारी दसऱ्यादिवशी शिंदे गट(cm eknath shinde) आणि ठाकरे गट(uddhav thackeray) या दोघांचाही दसरा मेळावा होणार आहे. दरम्यान अंधेरी विधानसभेचीसुद्धा पोट निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच चिन्हा संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यातील जनतेला विजयादशमीचा शुभेच्छा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा(maharahstra politics) खटला सर्वोच्च न्ययालयाच्या सुरु आहे. अशातच शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश घटनापीठाने निवडूक आयोगाला दिले होते. याच संदर्भात घडामोडींना वेग आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक अयोग्य सुद्धा आता कामाला लागल्याने केंद्रीय निवडून आयोगाने शिवसेनेला ५ ओक्टोबर पर्यंत मुदत दिली आहे.

हे ही वाचा – मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कळवा पुलाचं उद्घाटन करावं, जितेंद्र आव्हाडांची मागणी

बुधवारी शिवसेनेचा दसरा मेळाव शिवाजी पार्क येतेच होणार आहे. त्याच सर्व तयारी सुद्धा झाली आहे. अशातच दुसरीकडे मात्र धनुष्यबाण चिन्हांबाबत शिवसेनेला(shivsena) आपली भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडावी लागणार आहे. ठाकरेंनी आपली बाजू मांडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिवसेनेचे काही निवडक पदाधिकारी सर्व कागदपत्रे घेऊन दिल्लीत दाखल झाले असून, आयोगापुढे बाजू मांडण्यात येणार आहे. त्याच संदर्भांत शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात सुद्धा आहेत.

First Published on: October 5, 2022 10:18 AM
Exit mobile version