मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 23 जानेवारीला होणार चिपी विमानतळाचे उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 23 जानेवारीला होणार चिपी विमानतळाचे उद्घाटन

कानडी भाषेचा नाही तर कानडी अत्याचाराचा दुश्वास करणारच

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या २३ जानेवारीला पार पडणार आहे. २३ जानेवारी सकाळी १० महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित राहणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या चिपी विमानतळाची प्रतिक्षा सुरू आहे. गेली २० वर्षे या विमानतळाचे काम रखडले होते. मात्र आता सिंधुदुर्गात राहणाऱ्या लोकांची प्रतिक्षा आता संपली आहे.

२३ जानेवारी म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. याच दिवसाचे औचित्य साधून चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यावेळी एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. गेली अनेक दिवस नारायण राणेंनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. नारायण राणेंचे दोन्ही सुपूत्रही यात पुढे होते. दोन्ही राजकिय व्यक्तींमध्ये टिकाटिप्पणी सुरू होती.  चिपी विमानतळाचे उद्घाटन देशाच्या प्रजासत्ताक दिनी करावे अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र बाळासाहेबांच्या जन्मदिवशी या विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे.

चिपी विमानतळामुळे कोकणाच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. विमानतळामुळे सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा देशातील विविध प्रमुख शहरांशी जोडला जाणार आहे. या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने उतरवण्याच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. सुमारे साडेतीन किमीची धावपट्टी असलेले हे विमानतळ आहे. असे म्हटले जाते की या विमानतळामुळे सिंधुदुर्गला पर्यटनाला चालना मिळणार आहे.


हेही वाचा – उद्घाटनाच्या औपचारिकतेनंतर लसीकरण थांबणार

First Published on: January 17, 2021 4:37 PM
Exit mobile version