मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वन्यजीव सप्ताह सोहळ्याचे उद्धाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वन्यजीव सप्ताह सोहळ्याचे उद्धाटन

ST Workers : "एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच' म्हणत मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

वन्यजीव सप्ताह २०२१चे उद्धाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील वन्यजीव ‘वाईल्ड महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,  प्रधानसचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी,  प्रधान मुख्य वन संरक्षक सर्वश्री सुनील लिमये, जी साईप्रकाश यांच्यासह वन विभागातील अधिकारी कर्मचारी आणि वन्य जीव प्रेमी उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे उपस्थित होते.

वन्यजीव सप्ताह २०२१ च्या उद्धाटन समारंभाच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने वन्य जीव संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचे देखील यावेळी सादरीकरण करण्यात आले. मुंबईच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला मात्र ते होत असताना वन्यजीवांवर त्याचा किती आणि कसा परिणाम होत आहे याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. जो निर्सगा वरदान रुपाने आपल्याला भेटला आहे तो जपणे आपले कर्तव्य आहे.
विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे जात आहोत का याचा विचार करणे गरजेचे आहे,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सादरीकरणातील महत्वाचे वैशिष्ट्ये

 

First Published on: October 1, 2021 2:03 PM
Exit mobile version