केंद्र सरकारला लसीकरणाचे नियोजन न जमल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण राज्यांवर टाकले, अशोक चव्हाण यांचा आरोप

केंद्र सरकारला लसीकरणाचे नियोजन न जमल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण राज्यांवर टाकले, अशोक चव्हाण यांचा आरोप

दंगलीत आरोपी असलेल्या बोडेंनी शहाणपणा करु नये, अशोक चव्हाणांचा पलटवार

देशात सध्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु असून यामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. हे लसीकरण मोफत असून केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यात वेगाने लसीकरण करण्यात येत आहे. परंतु केंद्र सरकारकडून राज्यात लसीचा पुरवठा वेळोवेळी होत नसल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहेत. केंद्राकडून लस पुरवठ्यात सातत्याची हमी नसल्याने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण लस उपलब्धतेनुसार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे केंद्राने किमान ४५ वर्षावरील नागरिकांसाठी तरी वेळेवर आणि पुरेसा लस पुरवठा करावा, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की, केंद्राला लसीकरण मोहिम केंद्रीभूत ठेवायची होती. पण ४५ वर्षावरील म्हणजे एकूण २० टक्के लोकसंख्येच्या लसीकरणाचे नियोजनही केंद्राला जमले नाही. त्यामुळे १८ ते ४४ वर्षाचा वयोगट म्हणजे एकूण ४० टक्के लोकसंख्येच्या लसीकरणाची घोषणा करताना ती जबाबदारी मात्र राज्यांवर ढकलली, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभवत असताना लस पुरवठ्यातील दिरंगाई योग्य नाही अशी टीका काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी ट्विट करून केली. केंद्राकडून लस पुरवठ्यात सातत्याची हमी नसल्याने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण लस उपलब्धतेनुसार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे केंद्राने किमान ४५ वर्षावरील नागरिकांसाठी तरी वेळेवर आणि पुरेसा लस पुरवठा करावा, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत ३ दिवस लसीकरण बंद

लसीचा साठा नसल्यामुळे पुढील ३ दिवस मुंबईत लसीकरण मोहीम बंद राहणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. शिवाय त्यांनी या दिवसांमध्ये लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे नागरिकांना आवाहन केले आहे. बुधवारी रात्री मोजकाच लसीचा साठा मिळाला आहे. ७६ हजार डोसेस मिळाले आहेत, यापैकी दुपारपर्यंत ५० हजारांहून अधिक लसीचे डोस संपले आहेत. त्यामुळे उद्या आम्ही एखाद दुसरे केंद्राचा अपवाद वगळता सर्व केंद्रावर लसीकरण मोहीम पुढील साठा मिळेपर्यंत बंद राहिलं. याची सर्व जनतेने दखल घ्यावी अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

First Published on: April 29, 2021 8:48 PM
Exit mobile version