महाराष्ट्राचे वीरपुत्र शहीद जवान सचिन मोरे यांच्यावर अंत्यसंस्कार!

महाराष्ट्राचे वीरपुत्र शहीद जवान सचिन मोरे यांच्यावर अंत्यसंस्कार!

गलवान घाटात दोन सहकाऱ्यांना वाचवताना गुरुवारी वीर मरण आलेले जवान सचिन मोरे यांच्यावर त्यांच्या गावी मालेगावच्या साकोरी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचं पार्थिव घेऊन सैन्यातील अधिकारी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी साकोरीतील नागरिकांनी गर्दी केली आहे. शहीद मोरे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असून संपूर्ण गावात कडकडीत बंद आहे.

शहीद मोरे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, २ मुली आणि ६ महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. या विरपुत्राला श्रद्धांजली देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहे.

शहीद सचिन मोरे हे एसपी- 115 रेजिमेंट अंतर्गत लडाख सीमेवर साधारण वर्षभरापासून तैनात होते. सुमारे १७ वर्ष अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. लवान घाटीत नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या दोन सहकाऱ्यांना वाचवताना गुरुवारी त्यांना वीर मरण आले.

शहीद कुटुंबीयांना १ कोटी मदत केंद्र सरकार देणार, शहीद जवानाच्या वीरपत्नीला जवानाचा पगार मिळणार आहे. त्यांच्या  तिन्ही मुलांना देशात जिथे शिक्षण घेतील तिथे मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. अशी घोषणा  माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केली.


हे ही वाचा – कोरोनाबाबत WHO ने जगाला दिली गुड न्यूज, लसीबाबत केली मोठी घोषणा!


 

First Published on: June 27, 2020 12:07 PM
Exit mobile version