जगभरातील ५० देशांना हवेय CoWIN एपचे तंत्रज्ञान

जगभरातील ५० देशांना हवेय CoWIN एपचे तंत्रज्ञान

भारताने कोरोनाविरोधी लसीकरणामध्ये यूके आणि अमेरिकेलाही पिछाडीवर टाकत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. त्याचवेळी भारतात लसीकरणाची मोहीम यशस्वीरीत्या राबवणाऱ्या CoWIN एपचीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. कोविन पॅनेलचे चेअरमन असलेले आर एस शर्मा यांनी कोविन एपशी संबंधित एक मोठी माहिती जाहीर केली आहे. कोविनला ५० देशांमध्ये प्रसिद्धी मिळाल्याची माहिती त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्यासोबतच कोविन तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मोठी घोषणा त्यांनी केली आहे. अनेक देश कोविनचे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळेच कोविनला मिळणाऱ्या लोकप्रियतेच्या निमित्ताने मोठी घोषणा आर एस शर्मा यांनी केली आहे.

 

जगभरात कोविनला पसंती मिळत असून ५० देशांनी या तंत्रज्ञानाला पसंती दाखवल्याचे ट्विट आर एस शर्मा यांनी केले आहे. सेंट्रल आशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिका या देशांनी भारतातील कोविन एपच्या तंत्रज्ञानासाठी रस दाखवला आहे. या प्रतिसादामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने या एपचे ओपन सोर्स व्हर्जन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे एप मोफत अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत. डिजिटल इंडिया पुढाकाराअंतर्गतच हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या देशांने कोविनचे तंत्रज्ञान हवे आहे, अशा देशांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल असेही आर एस शर्मा यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गतच जगभरातील देशांना भारताकडून हे तंत्रज्ञान पुरविण्यासाठीचा पुढाकार घेण्यात आला आहे.

कोविनचा भारतातील वापर 

देशात ३२ कोटी लोकांनी कोरोनाविरोधी डोस घेतले आहेत. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २६ कोटी ६३ लाख तर दुसरा डोस हा ५ कोटी ६० लाख जणांनी घेतला. त्यामध्ये पुरूषांची संख्या १७ कोटी ३६ लाख तर महिलांची संख्या १४ कोटी ८७ लाख इतकी आहे. देशात सर्वाधिक डोस उत्तर प्रदेश या राज्यात देण्यात आले. त्यापाठोपाठ सर्वाधिक डोस हे महाराष्ट्रात देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. देशात कोविन एपवर ३४ कोटी ५१ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील १६ कोटी २८ लाख नागरिक आहेत. तर ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या १८ कोटी २२ लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे. देशात एकुण ४८ हजाराहून अधिक ठिकाणी लसीकरण केंद्रातून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ४६ हजार शासकीय केंद्रे आहेत, तर खासगी केंद्रांची संख्या १९५८ इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्राची संख्या आहे. फेसबुकला आरोग्य सेतू, डिजीलॉकर, उमंग, सीएससी, युएनडीपी यासारखे पार्टनर कोविन एपला पार्टनर म्हणून मदत करतात.

काय आहेत कोविन एपचे फीचर्स

– पिनकोडवर सर्च करण्याची सुविधा
– जिल्हावार सर्च करण्याची सुविधा
– मॅपवर सर्च करण्याची सुविधा
– नोंदणीचा पर्याय
– स्लॉट कम्फर्मेशनची सुविधा
– स्लॉट बुकिंगची सुविधा
– अपॉईंटमेंट बुकिंगची माहिती
– Do’s & Don’t


 

First Published on: June 28, 2021 5:25 PM
Exit mobile version