केडीएमसी: आचारसंहितेचा अडतथा दूर; पासाळ्यापुर्वी नालेसफाई होणार

केडीएमसी: आचारसंहितेचा अडतथा दूर; पासाळ्यापुर्वी नालेसफाई होणार

केडीएमसी मुख्यालय

आचारसंहितेच्या काळात नालेसफाई आणि रस्ते दुरूस्तीच्या कामांच्या निविदा काढण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. शासनाचे अवर सचिव नवनाथ बाठ यांनी पालिका आयुक्तांना एका पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे आता पावसाळयापूर्वी नालेसफाई आणि रस्त्यांच्या दुरूस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पालिकेला केाणतीही सभा घेता येत नाही. तसेच आर्थिक कामांना मंजुरी देता येत नाहीत. त्यामुळे आचांरसंहितेच्या अगोदर स्थायी समितीने नोलसफाईचे कोटयावधीचे प्रस्ताव मंजूर करून घेतले होते. मात्र रस्ते दुरूस्ती आणि नाल्यांच्या दुरूस्तीच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे हे प्रस्ताव प्रलंबीत राहिले होते.

अखेर नालेसफाईला परवानगी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने पालिकेला स्थायी समितीची सभा घेता येत नसल्याने पावसाळयापूर्वी नालेसफाई आणि रस्ते दुरूस्तीच्या कामांची मंजूरी आणि निविदा प्रक्रियाला ब्रेक बसला होता. पावसाळयापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे असल्याने नालेसफाईच्या निविदा प्रक्रियास परवानगी मिळावी, अशी मागणी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने सुमारे ४५ कोटी रूपयांचे नालेसफाई आणि रस्ते दुरूस्तींचे प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे एका प्रस्तावाद्वारे केली होती. राज्याचे मुख्य सचिव यु पी एस मदान यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय छाननी समितीने या प्रस्तावाला मंजूरी देऊन अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव भारतीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला होता. मात्र निवडणूक आयेागाकडूनही नालेसफाई आणि रस्ते दुरूस्तीच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करून निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे.

ही आहेत कामे

पावसाळयापूर्वी नालेसफाई (१० कामे ) : ४ कोटी १० लाख
गटार लाईन काढून टाकणे : १ कोटी ३५ लाख
रस्ते दुरूस्ती : ३६ कोटी ६८ लाख
नाल्याचा मार्ग बदलून पूर्नबांधणी करणे : १ कोटी ६७ लाख
रेल्वे ब्रीजखालील मॅन होल हलवणे : २७ लाख
कोपर स्टेशन येथील मुख्य लाईन हलवणे : १ कोटी २७ लाख

First Published on: May 4, 2019 9:35 PM
Exit mobile version