CORONA VIRUS : भारतीयांनी पुढील ७ आठवडे स्वतःला जपा

CORONA VIRUS : भारतीयांनी पुढील ७ आठवडे स्वतःला जपा

आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

जागतिक आरोग्य संघटना आणि सर्व देश करोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच एक अभ्यास अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये भारताला धोक्याचा इशारा दिला आहे.
आता भारतीयांनी काळजी नाही घेतली तर करोनाचे भयंकर स्वरूप येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. हा अभ्यास अहवाल COV-IND19 या गटाने केले आहे. या गटाने चीन, अमेरिका, इटली आणि अन्य देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा झाला याचा अभ्यास करत भारतीय आकडेवारीचे आकलन करत आहे.

मिशिगन युनिव्हर्सिटी, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, कनेक्टिक्ट युनिव्हर्सिटी आणि दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या बायो आणि डेटा शास्त्रज्ञाने सांगितले की, मे महिन्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वाढेल. करोना रुग्णांची संख्या जवळपास ६० हजार ते ९.१५ लाखापर्यंत पोहचू शकते.

First Published on: March 24, 2020 11:56 AM
Exit mobile version