इंदोरीकर महाराजांची पुढील सुनावणी 3 जुलैला

इंदोरीकर महाराजांची पुढील सुनावणी 3 जुलैला

पुत्रप्राप्तीचा मंत्र आपल्या कीर्तनातून देणार्‍या निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात शुक्रवारी हुकुमासाठी खटला सुरू झाला. मात्र वेळेअभावी त्यावर कामकाज होऊ न शकल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी 3 जुलैला ठेवली आहे.

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होते’ हे वादग्रस्त विधान इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून वेळोवेळी केले होते. इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मलन समितीच्या सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांच्या फिर्यादीनंतर संगमनेरच्या ग्रामीण हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर यांच्याकडून 19 जूनला न्यायालायात खटला दाखल करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी हे प्रकरण न्यायाधीश एम.एस. कोळेकर यांच्यासमोर हुकुमासाठी आले होते. यावेळी न्यायालयाकडून इंदोरीकर यांना समन्स पाठवण्यात येणार होती. परंतु वेळेअभावी न्यायालयाने कामकाज न करता 3 जुलैला पुढील सुनावणी ठेवली आहे.

First Published on: June 26, 2020 8:47 PM
Exit mobile version