सिंधुदुर्ग जिल्हा परिषद संगणक खरेदी घोटाळाप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद संगणक खरेदी घोटाळाप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद संगणक खरेदी घोटाळाप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

जिल्हा परिषद संगणक खरेदी घोटाळा प्रकरणी मनसेच्या तक्रारीनंतर ग्राम विकास विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत वॉटर प्युरीफायर घोटाळा उघडकीस आल्यानंतर संगणक खरेदीमध्येही घोटाळा झाला असल्याची तक्रार मनसे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली होती. त्याची दखल घेत संगणक खरेदीची सखोल चौकशी करण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या रॅकेटने यापूर्वी केलेले खरेदी व्यवहार हे प्रचंड अनियमितता दर्शवणारे ठरल्याने शासनाच्या पैशांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अलीकडेच शिक्षण विभाग वॉटर प्युरिफायर खरेदी घोटाळा प्रकरण ताजे असून कारवाईसाठी प्रलंबित असताना मनसेने जिल्हा परिषदेत संगणक खरेदी घोटाळ्याबाबत आक्षेप घेतला आहे.

मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील ग्रामपंचायत वित्त आरोग्य कृषी शिक्षण आदी विभागाकडील मागील तीन वर्षातील संगणक खरेदीमध्ये प्रचंड अनियमितता असून शासन नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप केला आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने हा घोटाळा केला असल्याची तक्रार मनसेकडून करण्यात आली होती. याबाबत मनसेच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग आणि विभागीय आयुक्त कोकण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना तात्काळ सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

उच्च दर्जाची संगणक खरेदी कागदावर दाखवून प्रत्यक्षात दुय्यम दर्जाचे संगणक खरेदी करण्यात आले असल्याचा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील खरेदी व्यवहार वादात सापडले आहे. जिल्हापरिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रॅकेट संगनमताने शासन निधीचा अपहार करत आहेत आणि राज्य शासनाकडील काही मंत्री अशा भ्रष्ट प्रवृत्तींना पाठीशी घालत असल्यानेच दिवसेंदिवस घोटाळ्यांमध्ये वाढ होत आहे. बदली झालेले अधिकारी नियमबाह्य पध्दतीने आस्थापनेत “ठेवून” घेतल्यानेच अशीच जिल्हा परिषद प्रशासनामध्ये घोटाळ्यांची मालिका चालूच राहणार आहे; या भ्रष्ट प्रवृत्तींवर कठोर कारवाई होत नसल्यानेच जनतेचा पैसा गिळंकृत करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत अशी प्रतिक्रिया मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्षक प्रसाद गावडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


हेही वाचा – ऑनलाईन मागवल्या ३७ तलवारी, औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीवर पोलिसांची मोठी कारवाई


 

First Published on: March 30, 2022 10:27 PM
Exit mobile version