घरताज्या घडामोडीऑनलाईन मागवल्या ३७ तलवारी, औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीवर पोलिसांची मोठी कारवाई

ऑनलाईन मागवल्या ३७ तलवारी, औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीवर पोलिसांची मोठी कारवाई

Subscribe

औरंगाबाद शहरात पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शहरात पुन्हा एकदा तलवारी मागविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. क्रांती चौक पोलिसांनी निराला बाजार येथील डीटीडीसी कुरियर कार्यालयावर छापा टाकला. या छाप्यामध्ये एक पार्सल बॉक्स सापडलं. त्यानंतर या बॉक्सची चाचपणी केली असता या पार्सल बॉक्समध्ये ३७ तलवारी आणि एक कुकरी जप्त करण्यात आली. औरंगाबाद शहरात कुरियरने तलवारी मागविण्याची ही तिसरी घटना आहे.

औरंगाबाद आणि जालना या दोन शहरांमधून ७ ग्राहकांचे पत्ते या पार्सलवर आढळून आले आहेत. यामध्ये पाच औरंगाबादचे ग्राहक असून दोन जालन्याचे ग्राहक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, कुरियरने शहरात तलवारी आल्याची माहिती मिळाली. यावरून क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने निराला बाजारा येथील डीटीडीसी कुरियरच्या कार्यालयावर छापा टाकला. परंतु व्यवस्थापक जोगदंड यांना याबाबत माहिती विचारली असता, असे कोणतेही प्रकारचे पार्सल आले नसल्याची माहिती त्यांनी सांगितली.

मात्र, पोलिसांनी कार्यालयात पाहणी केली असता पार्सल बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाईन मागवलेल्या तलवारीचा साठा आढळून आला. एकूण सात ग्राहकांनी या तलवारी मागवल्या होत्या. यामध्ये औरंगाबाद आणि जालन्याचे काही आरोपी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, वाढदिवसाच्या कार्यक्रमात सुद्धा तलवारींचा उपयोग केक कापण्यासाठी एक फॅशन म्हणून केला जातो. त्यामुळे अमृतसर आणि जालंधर येथून आलेल्या तलवारी नक्की कोणत्या कारणासाठी मागविल्या होत्या, यासंदर्भातील चौकशी केली जात आहे.


हेही वाचा : Lakshya Zero Dumpsite : राज्यातील 433.74 कोटींच्या कचऱ्यावरील प्रक्रिया संबंधी प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -