आयएनएस रणवीर युद्धनौकेवरील स्फोटात 3 जवान शहीद, स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट

आयएनएस रणवीर युद्धनौकेवरील स्फोटात 3 जवान शहीद, स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट

INS Ranvir Explosion: एसी कंपार्टमेंटमधील गॅस गळतीमुळे आयएनएस रणवीरचा झाला स्फोट

आयएनएस रणवीर या युद्ध नौकेवर झालेल्या स्फोटात ३ नौदलाचे जवान शहीद झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड आहे तिथे आयएनएस रणवीर या युदधनौकेच्या कंपार्टमेंटमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात ३ नौदल जवान जखमी झाले होते ते शहीद झाले आहेत.

आयएनएस रणवीर या युद्धनौकेवर झालेल्या स्फोटामध्ये कोणतीही वित्तहानि झाली नाही तरी जीवित हानी झाली आहे. आयएनएस रणवीर नोव्हेंबर २०२१ पासून ईस्टर्न नेव्हल कमांडच्या क्रॉस कोस्टल ऑपरेशनसाठी तैनात होती. लवकरच ही युद्ध नौका बेस पोर्टवर येणार होती. यापूर्वीच ही घटना घडली आहे. याची चौकशी आता ईस्टर्न नेव्हल कमांडकडून करण्यात येणार आहे.

अद्याप तरी स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नाही कारण नौकेमध्ये आतल्या भागातील कम्पार्टमेंटमध्ये स्फोट झाला आहे. स्फोटानंतर या प्रकरणाची सगळी चौकशी करण्यात येणार आहे.  स्फोट झाला तेव्हा इतर जवान आतमध्ये होते त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला यामुळे ते नौकेतून बाहेर आले आहेत. वित्तहानी झाली नसली तरी ३ जवान या स्फोटात शहीद झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

In an unfortunate incident today at Naval Dockyard Mumbai, 3 naval personnel lost their lives in an explosion in an internal compartment onboard INS Ranvir. Responding immediately, the ship’s crew brought the situation under control. There is no major material damage. pic.twitter.com/c9wJUieCCj

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे आज एक दुर्दैवी घटना घडली. INS रणवीरच्या एका अंतर्गत डब्यात झालेल्या स्फोटात नौदलाच्या तीन जवानांना जीव गमवावा लागला. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये कोणतीही मोठी वित्तहानी झालेली नाही. INS रणवीर पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, याच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत.


हेही वाचा : अरे बापरे! धावत्या ट्रेन समोर महिलेला दिला धक्का अन् म्हणाला…

First Published on: January 18, 2022 9:47 PM
Exit mobile version