API यांना ‘वन स्टेप प्रमोशन’ पदोन्नती देऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नेमणूक

API यांना ‘वन स्टेप प्रमोशन’ पदोन्नती देऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नेमणूक

राज्यातील २४ सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) यांना वन स्टेप प्रमोशन प्रमाणे पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नत तात्पुरत्या स्वरूपात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील विविध जिल्ह्यात त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमणुक करण्यात आलेले अधिकारी यांना गेल्याच महिन्यात पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली होती व त्यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली होती.

राज्यातील २००७ च्या बॅचचे पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्यांना एप्रिल २०२१ मध्ये सहायक पोलिस निरीक्षक पदोन्नती देण्यात आली होती. यापैकी राज्यासह मुंबई आणि दहशतवाद विरोधी पथकातील सुमारे २४ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची बदली राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखवण्यात आली होती. या ठिकाणी या अधिकाऱ्यांना ( वन स्टेप प्रमोशन) पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

या पदोन्नती नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यातील विविध ठिकाणी त्यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारी हे आदेश पोलीस महासंचालक मुख्यालय येथुन जारी करण्यात आले आहे. या नेमुणकीत मुंबई शहरातील ४ राज्य दहशतवाद विरोधी पथकातील १ आणि इतर जिल्ह्यातील १९ असे एकूण २४ पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे.


हेही वाचा – शरद पवारांच्या पत्राची घेतली दखल, रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन

 

First Published on: May 19, 2021 9:48 PM
Exit mobile version