व्हायरल केलेले पत्र खोटे,मला बदनाम करण्याचा डाव; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे स्पष्टीकरण

व्हायरल केलेले पत्र खोटे,मला बदनाम करण्याचा डाव; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे स्पष्टीकरण

मागील महिन्यात बदली झालेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश तथा केपी यांनी वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची कमाई तथा वसूली केल्याचे पत्र शुक्रवारी व्हायरल झाले. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी कृष्ण प्रकाश यांचे रिडर म्हणून काम केलेले एपीआय डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाने व सहीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेले हे पत्र बनावट असल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता याप्रकरणी कृष्ण प्रकाश यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझ्या पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून चुकीची कामे करून घेतल्या बाबतचा तक्रारी अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर पत्र खोटे असल्याची माहिती कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले होते. ज्यामध्ये पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप होता. यावर कृष्ण प्रकाश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने सदर लेटर हे केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापुर्वी देखील वारंवार केले गेले होते व ते असफल ठरलेले आहेत”, असंही कृष्ण प्रकाश म्हणाले.

“पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून काम करत असताना नागरिकांचे सर्वाधिक प्रेम, आपुलकी व आशीर्वाद मिळाले असल्यामुळे अशा प्रकारचे विघ्नसंतोषी लोकांचे आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर देणार आहे, तसेच जे कोणी माझी अशा प्रकारची बदनामी करू इच्छितात त्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की मी माझ्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात चांगले स्थान निर्माण करू शकलो व पोलीस दलाची प्रतिमा कायम उज्वल करू शकलो त्याला धक्का लावणे माझे कायदेशीर व अनुशासनात्मक कारवाईमुळे दुखावलेल्यांना कदापि शक्य नाही”, अशा शब्दांत कृष्ण प्रकाश यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.


हेही वाचा – Reliance Industries : ‘रिलायन्स’ ठरली 100 अब्ज डॉलर कमावणारी पहिली भारतीय कंपनी

First Published on: May 7, 2022 8:49 AM
Exit mobile version