देशाच्या राजकीय विचारधारेत बदल होणे गरजेचे – के.सी.आर.

देशाच्या राजकीय विचारधारेत बदल होणे गरजेचे – के.सी.आर.

अबकी बार शेतकरी सरकार; कृषी, पाणी समस्यांवरून केसीआर यांची महाराष्ट्रात पेरणी

भारतीय राष्ट्रीय समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्रातील नांदेड दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘बीआरएस’ने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. नांदेडमध्ये झालेल्या सभेत के. चंद्रशेखर राव यांनी ‘अबकी बार शेतकरी सरकार’ असा नारा दिला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर मुद्दे मांडत केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच, परिवर्तनाची हीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले. (It is necessary to change the political ideology of the country says KCR)

नांदेडमधील गुरुद्वाराला भेट दिल्यानंतर के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारतीय राष्ट्रीय समितीचा प्लॅन जनतेसमोर मांडला आणि परिवर्तन होण्याची हीच वेळ आहे, असे सांगितले. शिवाय, “संपूर्ण जगात आपण पाहिलं तर, ज्या देशाने ठरलेल्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम केल, त्याच देशात विकास झाला आहे. त्यामुळे भारताच्या विचारधारेतही आता बदल होण्याची गरज असून, हा बदल घडवण्यासाठी बीआरएस मोठ्या प्रमाणात प्रयत्न करेल”, असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

“विचारधारा बदलली तर, भारत नक्कीच बदलेल. देशात मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. मात्र देशातील नागरिक त्या संपत्तीपासून वंचित आहे. तुम्ही साधे पाण्याचे उदाहरण घ्या. पाण्यावरून आपल्या देशात नेहमीच वाद होत असतात. दरम्यान, देशाची विचारधारा बदलण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला शिकवणं गरजेचे आहे”, असेही के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

“देशातील नागरिकांची दिशाभूल केली जाते. देशात गरजेपेक्षा अधिक पाणी उपलब्ध आहे. देशाला पिण्यासाठी लागणारे पाणी, सिंचनासाठी, शेतीसाठी लागणारे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्या देशात 1 लाख 40 हजार टीएमसी पावसाची नोंद होते. एवढा पाऊस पडत असतानाही पाणी नागरिकांना का पाणी दिले जात नाही? मला वाटते सरकारमध्ये बदल झाल्यास नक्कीच पाणी सर्वांना उपलब्ध होईल’, असेही के. चंद्रशेखर राव म्हणाले.

“मागील अनेक वर्षांपासून केंद्रात येणारे सरकार संपूर्ण देशातील नागरिकांना कथा सांगत राहते. आपल्या देशात पाण्याची कमी नाही, तरीही आपण पाण्यासाठी भांडण करत असतो. आपल्या देशातला नागरिक त्याला लागणाऱ्या मुलभूत गरजांसाठी नेहमीच भांडत असतो. त्यामुळे मला वाटतं सरकारमध्ये बदल होण्याची गरज आहे”, असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – अब की बार शेतकरी सरकार…; कृषी, पाणी समस्यांवरून केसीआर यांची महाराष्ट्रात पेरणी

First Published on: February 5, 2023 6:20 PM
Exit mobile version