१०० व्या अ.भा. नाट्य संमेलनाध्यक्षपदी जब्बार पटेल

१०० व्या अ.भा. नाट्य संमेलनाध्यक्षपदी जब्बार पटेल

जब्बार पटेल

प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. १००व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी बुधवारी केली. यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे १००वे वर्ष आहे.

अध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल

जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी या दोघांचेच अर्ज अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आले होते. हे दाखल झाल्यानंतर नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीद्वारे चर्चा होऊन या बैठकीत जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत जब्बार पटेल यांच्य़ा नावाची घोषणा करण्यात येणार आहे.


‘IFFI’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार २००पेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रीकरण
First Published on: November 20, 2019 8:04 PM
Exit mobile version