जळगावातील कबड्डीचा सामना पाहण्यासाठी गेलेल्या 13 तरुणांच्या टेम्पोचा भीषण अपघात; तिघे ठार, 6 जखमी

जळगावातील कबड्डीचा सामना पाहण्यासाठी गेलेल्या 13 तरुणांच्या टेम्पोचा भीषण अपघात; तिघे ठार, 6 जखमी

जळगाव :  जळगावातील चोपडा तालुक्यातील वैजापूरमधील कबड्डीची स्पर्धा पाहण्यासाठी गेलेल्या 13 तरुणांच्या टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 3 तरुणं जागीच ठार झाले आहेत तर 6 तरुण जखमी झाले आहे. सोमवारी रात्री 9 च्या सुमारास मध्यप्रदेशच्या हद्दीतील जामटी गावाजवळील वळणाच्या रस्त्यावर हा अपघात झाला. चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. निलेष शांतीलाल बारेला, जगदीश केरसिंग बारेला आणि पंकज प्रकाश बारेला अशी मृत तरुणांची नावं आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, वैजापूरमधील 13 तरुण एम.एच. १९ ८७४८ क्रमांकाच्या पीअप वाहनाने मध्य प्रदेशात कबड्डाची स्पर्धा पाहण्यासाठी जात होते. यावेळी वैजापूर गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील मध्य प्रदेशाच्या हद्दीतील बडवाणी गावात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी तीन वेळा रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात निलेश बारेला, जगदीश बारेला या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर पंकज बारेला याचा जळगावातील स्थानिक रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला.

दरम्यान राहुल वैर सिंग बारेला, विवेक संजय बारेला, शामा राजेंद्र बारेला, परशुराम जाश्या बारेला, दिलीप वैर सिंग बारेला, राहुल सरदार बारेला आणि रोहन सरदार बारेला हे सहा तरुण अपघातात जखमी झाले आहेत. या जखमींपैकी राहुल बारेला आणि विवेक बारेला या दोघांना जळगावमधील खाजगी रुग्णालयात आणि इतरांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या तरुणांना वैजापूर गावातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हळहळ व्यक्त होत आहे.


मेट्रो प्रकल्पामुळे राजकीय प्रदूषणसुद्धा बंद झालं; मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला

First Published on: August 30, 2022 12:46 PM
Exit mobile version