घरमहाराष्ट्रमेट्रो प्रकल्पामुळे राजकीय प्रदूषणसुद्धा बंद झालं; मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला

मेट्रो प्रकल्पामुळे राजकीय प्रदूषणसुद्धा बंद झालं; मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला

Subscribe

मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मात्र वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो ३ च्या चाचणीला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. दोघांच्या उपस्थितीत आज मेट्रो 3 ची ट्रायल घेण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मेट्रो प्रकल्पामुळे राजकीय प्रदूषणसुद्धा बंद झाल्याचे म्हणत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

यावेळी बोलतानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मेट्रो प्रकल्पामुळे वायूप्रदूषण कमी होईल, साडे सहा लाख रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल, सतरा लाख प्रवासी प्रवास करतील. वेळ वाचेल, साडे तीन लाख इंधनाची बचत होईल, खूप मोठा फायदा आहे. या प्रकल्पामुळे आत राजकीय प्रदूषणसुद्धा बंद झालं आहे. पर्यावरणाचं समतोल राखणे आपलं काम आहे. लोकलचा प्रवास करताना अतिशय त्रास लोकांना होतो. मात्र हा 33 किलोमीटरचा प्रवास आरामदायी होणार आहे, या प्रकल्पातून आपण पर्यावरणाचा असमतोल, ऱ्हास अशाप्रकारे कांगावा केला जातो. मात्र या प्रकल्पाच्या तीनही बाजूने रस्ते आहेत. या प्रकल्पासाठी आपण जंगलात जाऊन झाडं तोडतो असा विषय नाही, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सर्वांच्या परवानगीनंतरच प्रकल्प सुरु केला आहे.

- Advertisement -

“पूर्ण बॅटिंग करण्यासाठी अडीच वर्षे, कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचेत”

एखादा प्रकल्प चल रहा है, चल रहा है… सरकारी काम सहा महिने थांब असं काही करायचं नाही आम्हाला. आम्हाला कमी वेळात जास्त काम करायचं आहे. आम्हाला पूर्ण बॅटिंग करण्यासाठी अडीच वर्षचं आहेत. त्यामुळे कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आहेत. सभागृहात सर्वांना त्या दिवशी एकचं तुम्हाला भारी पडत होता असं सांगितलं . आता एक से भले दो आहे. त्यामुळे आम्ही कुठे राजकारण करणार नाही. लोकांना जे पाहिजे ते देणार आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना निशाणा साधला आहे.

युतीचे सरकार येऊन 2 महिने झाले, आज ३० तारीखेला झाला, दोघांचा शपथविधी आणि दोन महिने झाले आहेत. म्हणजे तेव्हा दोघांचा झाला होता. त्यामुळे बहुचर्चित अश्या मेट्रोला चाचणीला हिरवा कंदील दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो प्राधिकरण महामंडळाचे अभिनंदन करतो, सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. असही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

डीसीएमने सांगितले की, मुंबईकरांच्या महत्त्वाच्या प्रकल्पावरील स्थगिती उठवली आणि दिर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न केला, खरं म्हणजे गेली अडीच वर्षे पाहिले त्यात मी जात नाही, मात्र यापुढील पाच वर्षे या राज्यामध्ये राज्याचा कारभार पाहिला तर अनेक प्रकल्प त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरु झाले आणि पाच वर्षात त्या प्रकल्पांनी खूप मोठी प्रगती देखील केली. मी त्यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होतो. राज्यात जे महत्त्वाचे प्रकल्प कार्यानिवीत होताना पाहतो. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे.

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उदाहरण देईन, त्यावेळी देवेंद्रजींनी सांगितले की, हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे तेव्हा अनेक लोकांनी विरोध केला अनेकांनी काय करायचं ते केलं परंतु त्या प्रकल्पाचा फायदा राज्य़ातील मोठ्या प्रमाणावर विदर्भ ,मराठवाडा, कोकण या सर्व भागांना होणार होता. देवेंद्र फडणवीसांच्या इच्छा शक्तीप्रमाणे काम केले. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे सरकारावर निशाणा साधला आहे.

आता आपण पाहतोय की तो संपूर्ण रस्ता पूर्णत्वास जात आहे. त्यांच लवकरंच नागपूर ते शिर्डी उद्धाटन करत आहोत. असे अनेक प्रकल्प सुरु केले परंतु त्यामध्ये काही विघ्न आले आहेत. उद्या गणरायाचे आगमन आहे. त्याप्रमाणे अश्विनी भिडे यांनी योग साधत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आता वाटत नाही की विघ्न येतील विघ्नहर्त्याने राज्यावरील बरीचशी विघ्न दूर केली आहेत. असही मुख्यमंत्री म्हणाले..


पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -