भयाण वास्तव! पायी निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू

भयाण वास्तव! पायी निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू

भयाण वास्तव! पायी निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू

लॉकडाऊन दरम्यान हाताशी काम नसल्यामुळे अनेक परप्रांतिय मजूर आपापल्या मुळगावाकडे परत निघाले आहेत. गेल्या ४५ दिवसांपासून अडकून पडलेल्या मजुरांचा संयम सुटला असून मिळेल त्या मार्गाने आता हे मजूर आपापल्या गावी परतू लागले आहेत. तसेच, स्थलांतरित मजूरांना आपापल्या गावात सोडण्यासाठी केंद्र सरकारने देखील परवानगी दिली आहे. मात्र, असे असताना देखील अनेक जण पायी प्रवास करत आहेत. परंतु, हा पायी प्रवास जीवघेणा ठरत कालच सहा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा दोन मजुरांनचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू

मुंबईतून उत्तर प्रदेशाकडे चालत निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर एका मजुरांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या मजुराने उपासमारीला कंटाळून पुलावरुन उडी मारून नदीच्या पात्रात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे मजूर मुंबईहून उत्तर प्रदेशच्या दिशेने निघाले होते. हे मजूर वाटेत जे मिळेल ते खात होते. तर अनेकदा काही खाण्यास मिळाले नाही की ते पुन्हा आपली वाटत धरत होते. असे करत करत ते जळगावपर्यंत पोहोचले. मात्र, डोक्यावर ऊन आणि पोटात काही नाही. त्यामुळे हे मजूर थकले आणि त्यातच दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका मजुराने थेट नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नुकतेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उपासमारीने किंवा भुकेने कोणत्याही मजुराचा मृत्यू होणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र गोयल यांच्या आश्वासनाच्या काही तासातच जळगावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

आठ मजुरांचा अपघात

पायी जाणाऱ्या मजुरांवर यापूर्वीही अनेक संकट ओढावली आहेत. कालच पायी जाणाऱ्या ८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये रेल्वेखाली चिरडून १६ मजुरांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना होऊन आठवडाही उलटला नसताना आता पुन्हा ही घटना घडली आहे.


हेही वाचा – धक्कादायक! वडिलांनी केला ६ वर्षाच्या निष्पाप मुलीचा खून, चिमुरडीला गळा दाबून संपवलं


 

First Published on: May 15, 2020 3:47 PM
Exit mobile version