…म्हणून लाठीचार्ज झाला; भुजबळांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला, जरांगेंवर केले गंभीर आरोप

…म्हणून लाठीचार्ज झाला; भुजबळांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला, जरांगेंवर केले गंभीर आरोप

अंबड: आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नको, असं म्हणत मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. त्या दिवाशी पोलिसांनी लाठीचार्ज का केला, याचा घटनाक्रम सांगताना त्यांनी जरांगेंवर टीका केली आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, यासाठी ओबीसी आणि भटके विमुक्त आरक्षण एल्गार सभा घेण्यात आली आहे. जालनातील अंबड येथे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला संबोधित करताना मंत्री छगन भुजबळ यांनी  जरांगेंवर गंभीर आरोप केले. (Jalna Antarwali Sarate gaon Chhgan Bhujbal told the entire sequence of events made serious allegations against Manoj Jarange patil)

भुजबळ म्हणाले की,  पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला पण 70 पोलीस ज्यात महिला पोलिसही होत्या ते सगळे हॉस्पीटलला अॅडमिट होते. दगडाचा मार त्यांना लागला होता. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं मी सांगतो तुम्हाला, असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रमच सांगितला. भुजबळ म्हणाले की, आधी पोलीस जरांगे पाटलाला उठवायला गेले होते. पण त्याने मी झोपलो आहे नंतर या असं सांगितलं आणि पोलिसांना परत पाठवलं. त्यानंतर याने गच्चीवर दगड वगैरे आणून ठेवले, सगळी तयारी केली. नंतर जेव्हा पोलीस आले आणि याला विनंती केली की, तुमची तब्बेत खराब आहे, डॉक्टरकडे चला. त्यावेळी त्या पोलिसांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडाचा मारा सुरू झाला. या लोकांनी पोलिसांना दगडं मारले आणि त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. नाहीतर 70 पोलीस काय पाय घसरून पडले का? असा सवाल यावेळी भुजबळांनी केला. या 70 पोलिसांना कोणी मारलं? हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड आहे, असं म्हणत पोलिसांना मारण्याचा कट जरांगें पाटलांनी रचल्याचा दावा भुजबळांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या सुनेलाही आई म्हटलं आणि तुम्ही…

भुजबळ म्हणाले की, राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तसंच, नीलम गोऱ्हे  आणि आणखी कोणी महिला असतील तर त्यांनी इथे यावं. मी त्यांना त्या महिला पोलिसांचे पत्ते देतो. त्यांनी जाऊन विचारावं त्या महिला पोलिसांना की त्यांच्यासोबत काय झालं होतं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या सुनेलाही आई म्हणून परत पाठवलं आणि तुम्ही महिला पोलिसांवर हल्ले करता, लाज नाही वाटली तुम्हाला, असं भुजबळ म्हणाले.

एकच बाजू समोर आली

अंतरवाली सराटे गावात जेव्हा लाठीचार्ज झाला. तेव्हा टीव्हीला लाठीचार्ज झाल्याचं दाखवलं गेलं. समोर फक्त आंदोलकांची बाजू आली. पोलिसांची बाजू समोर आलीच नाही. पोलिसांवर हल्ला झाला होता, त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी काय करायला हवं होतं? असा सवाल यावेळी भुजबळांनी केला.

(हेही वाचा:  गोपीचंद पडळकरांनी केले छगन भुजबळांचे कौतुक, ओबीसींना एकजूट होण्याचे आवाहन )

First Published on: November 17, 2023 3:38 PM
Exit mobile version