घरमहाराष्ट्रगोपीचंद पडळकरांनी केले छगन भुजबळांचे कौतुक, ओबीसींना एकजूट होण्याचे आवाहन

गोपीचंद पडळकरांनी केले छगन भुजबळांचे कौतुक, ओबीसींना एकजूट होण्याचे आवाहन

Subscribe

ओबीसी महाएल्गार सभेच्या माध्यमातून विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे कौतुक करत नाव न घेता मराठ्यांच्या वाताहतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जबाबदार धरले आहे.

जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागत सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या प्रमुख मागणीसोबतच इतर काही मागण्यांसाठी आज (ता. 17 नोव्हेंबर) जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राजेश राठोड, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, महादेव जानकर, आमदार देवयानी फरांदे हे उपस्थित आहेत. मात्र, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. परंतु, या महासभेमध्ये विविध पक्षाचे ओबीसी नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. (Gopichand Padalkar praised Chhagan Bhujbal, appealed to OBCs to unite)

हेही वाचा – भुजबळ भावूक होऊन म्हणाले, ‘गोपीनाथ मुंडे असते तर OBC समाजावर संकट आलं नसतं’

- Advertisement -

या सभेच्या माध्यमातून विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे कौतुक करत नाव न घेता मराठ्यांच्या वाताहतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जबाबदार धरले आहे. यावेळी सभेत बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, 17 नोव्हेंबर या दिवसाचीै महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल. गटात आणि पक्षापक्षात विभागलेले वाघाचे बछडे एकत्र आले आहेत. ओबीसींना सहज आरक्षण मिळाले नव्हते. मोठा संघर्ष उभा राहिला मग आरक्षण मिळाले. आरक्षणाची वाटमारी करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. ओबीसींना त्रास देण्याची भूमिका घेतली आहे. ओबीसी समाज आता पूर्णपणे जागा झाला आहे. ओबीसीचा ढाण्या वाघ म्हणजे छगन भुजबळ आहेत. वाघ वयस्कर झाला म्हणून डरकाळी फोडायचे राहत नसतो, सिंह म्हातारा झाला म्हणून तो गवत खात नाही मांसच खात असतो. त्यांनी ओबीसींमध्ये उर्जा निर्माण करण्याचे काम केले आहे, असे म्हणत पडळकरांनी त्यांचे कौतुक केले.

ओबीसींची ही सभा पाहून ओबीसीच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे. देशात ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलने उभी राहिली, त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले. या आरक्षणात काटे आणण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांना सरळ करण्याचे काम या ओबीसींमध्ये आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु ओबीसीमधील 346 जातींचे आरक्षणाला हात लावता काम नये. आजही ओबीसीतील अनेक लहान जाती या आरक्षणापासून वंचित आहेत. अनेक जातींना या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होणार असेल तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांच्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच, गरीब मराठा समाजला आरक्षण मिळाले पाहिजे. ही आमचीही भूमिका आहे. मराठा आरक्षणला कोणाचा विरोध नाही. परंतु, 346 जाती असलेल्या ओबीसी समाजातील जातींना धक्का न लावता आरक्षण द्या. त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल. प्रस्थापितांना उत्तर देऊ. महाराष्ट्र समाजाची वातहात कोणी केली? असा प्रश्न उपस्थित करत पडळकरांनी शरद पवार यांचे नाव न घेता ओबीसी समाजाला प्रश्न केला. ओबीसी तुमचा शत्रू नाही, तुमचा शत्रू ओळखा. 2014 साली मराठा समाजाला जसे फडणवीस यांनी आरक्षण दिले तसेच आरक्षण मराठा समाजाला द्या. ओबीसींच्या मतावर निवडून येता. त्याचे राजकारण करता आणि आता त्यांच्याविरोधातच भूमिका घेता. हे जास्त काळ चालू द्यायचे नाही. गावागावांत ओबीसींचे संघटन झाले पाहिजे. ओबीसींच्या मुळावर उठणाऱ्या विरोधात एकजूट झाली पाहिजे, असे आवाहन या सभेच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -