जालन्यात ३१ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद

जालन्यात ३१ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद

जालन्यात ३१ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. जालना जिल्ह्यातही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत झाली आहे. सध्या जालनामध्ये ४७५ कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता जालना जिल्ह्यात शाळा, कॉलेज, खाजगी क्लासेस, आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा जालनातील जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहेत. तसेच शहरातील फळभाजी विक्रेते, पेपर विक्रेते यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे जालनामध्ये आजपासून ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात पुन्हा सशर्त लॉकडाऊन जाहीर झाला आहे. जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्यांसह उच्च पदस्त अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यतील वाढत्या रुग्णसंख्येवर चर्चा करण्यात आली. ३१ मार्चपर्यंत काही गोष्टी बंद ठेवण्यात आल्या.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असून, शहरात रविवारी ४५ नव्या रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागातही ५१ रुग्ण आढळले असून, भोकरदन तालुक्यातील महानुभाव पंथाचे देवस्थान असलेल्या जाळीचा देव येथे ४५ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जालनामध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडूनही जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी नवनवीन निर्बंध लादले जात आहे.
या जिल्ह्याचा बहुतांश भाग हा बुलढाणा जिल्ह्याला लागुन आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे याचा परिणाम जालनामधील भोकरदन, जाफरबाद तालुक्यातही जाणवू लागला आहे. प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहे. तर व्यापारी, हॉटेल चालक, भाजी विक्रेते हे सुपरस्प्रेडर ठरत असल्याने सर्वांची रॅपिट अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच कोरोना नियमावली न पाळणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी नगर पालिकेचे पथके स्थापन करण्यात आल्या आहेत.

 

First Published on: February 24, 2021 11:13 AM
Exit mobile version