जयंत पाटलांची प्रकृती उत्तम, ब्रीच कँडीमध्ये झाली अँजिओग्राफी चाचणी

जयंत पाटलांची प्रकृती उत्तम, ब्रीच कँडीमध्ये झाली अँजिओग्राफी चाचणी

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आज अँजिओग्राफी चाचणी करण्यात आली. यामध्ये कोणताही दोष आढळला नसून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं स्वत: जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. त्यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली.

राज्याच्या मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक सुरु असताना जयंत पाटील यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जयंत पाटील यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, आजा अँजिओग्राफी करण्यात आली असून चाचणीत कोणताही दोष आढळलेला नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“आज ब्रीच कँडी रुग्णालयात माझी अँजिओग्राफी चाचणी झाली असून त्यात कोणताही दोष आढळलेला नसल्याने काळजीचे कारण नाही. दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर लगेचच जनसेवेत रुजू होण्याचा माझा मानस आहे. आपण व्यक्त केलेल्या संवेदनांप्रती मी आपला आभारी आहे,” असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

First Published on: July 29, 2021 2:23 PM
Exit mobile version