राष्ट्रवादी राज्यातील कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष, शरद पवारांनी नव्या लोकांना संधी दिली – जयंत पाटील

राष्ट्रवादी राज्यातील कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष, शरद पवारांनी नव्या लोकांना संधी दिली – जयंत पाटील

भुजबळांबाबतच्या निर्णयावर समाधान, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २२ वर्षांची वाटचाल पुर्ण करत आहे. राष्ट्रवादीचा २२ वर्षांचा काळ हा चढउताराचा होता. परंतु या काळात शरद पवारांच्या नेतृत्वात राजकारण घडत गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात शरद पवारांचा प्रभाव आताही आणि पुर्वीही होता. या प्रवासात नव्या चेहऱ्यांना पक्षाने संधी दिल्या आहेत. सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांना पदावर बसवले आहे. लोकशाहीचा खरा अर्थ लोकांना समजून घेण्याचं काम शरद पवार यांनी आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी केलं आहे. अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवासाविषयी माहिती दिली आहे.

पक्षाची स्थापना करताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जे सहकारी होते ते त्यावेळी त्यांच्या जिल्ह्यातील प्रभावी नेते होते. म्हणून त्यांना प्रस्थापित म्हटले गेले होते त्यातून आर.आर. पाटील यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री झाला. असे अनेक नेते आहेत जे प्रस्थापित नसताना शरद पवार यांनी पुढे आणले आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. महाराष्ट्रात एखादा कर्तबगार कार्यकर्ता नेता असेल तर राष्ट्रवादीमध्ये त्याचे फलित होते हे देखील शरद पवार यांनी दाखवून दिले असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २२ वर्षांचा कालावधी झालाय तर पुढील ध्येय धोरणांबाबत जयंत पाटील म्हणाले की, पक्ष हा समाज परिवर्तन आणि प्रगतीचे मोठं साधन आहे. शरद पवारांनी राज्यातील प्रगतीचा ध्यास धरला आहे. राज्यात औद्योगिकरण सुरु आहे त्याचा सुवर्णकाळ शरद पवारांच्या काळात झाला आहे. महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य व्हावं यासाठी राज्यातील सत्ता लोकहितासाठी राबवण्याचे काम झालं पाहिजे. २०२४ पर्यंत महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक ताकदीने उभी राहील आणि अधिक सक्षमतेने लढेल असं जयंत पाटील यांनी सांगितले.

पक्ष अधिक चांगला आला आणि जनतेने साथ देतील तसे शरद पवार काम करतील. सध्या पक्ष बलवान करणं पहिले काम आहे. महराष्ट्रातील जनतेला, गोर-गरीबांना जे जे प्रश्न भेडसावत आहेत ते प्रश्न सोडवणूक करणं आणि अधिक चांगले राज्यातील जीवनमान चांगले करणे याबाबत काम करत राहणार राहू.

केंद्रात शरद पवारांनी २००४ ते २०२१४ मध्ये मंत्री होते त्यावेळी त्यांनी दाखवून दिले की, कृषी मंत्री काय करु शकतो. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येकानं कोणी काय केलं नव्हते ते शरद पवार यांनी गेल्या १० वर्षात केलं आहे. शरद पवारांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे देशातील सर्वच नेते त्यांच्याकडे आस्थेने पाहत आहेत. मंत्रीपद फार महत्त्वाचं नसते जनतेच्या मनातलं स्थान फार महत्त्वाच असते. मंत्रीपद येतात जातात शरद पवार फार त्याला महत्त्व देत नाहीत. इतर पक्षातील लोकंही पवार साहेबांवर प्रेम करतात अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

First Published on: June 9, 2021 12:47 PM
Exit mobile version