जयंत पाटलांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, १० जणांच्या लसीचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

जयंत पाटलांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, १० जणांच्या लसीचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

जयंत पाटलांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, १० जणांच्या लसीचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. देशात आजपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. १ मे पासून १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज लसीचा पहिला डोस घेतला आहे. राज्यात कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन केल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत प्रतिक जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या#Citizens4Maharashtra या मोहिमेचे समर्थन म्हणून दहा जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचे जंयत पाटील यांनी जाहीर केले. लस अगदी सुरक्षित आहे त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमानुसार लस घ्यावी असे आवाहन नागरिकांना त्यांनी केले. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे आणि परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल असा विश्वास व्यक्त केला शिवाय या तरुणांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुकही राष्ट्रावादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

जयंत पाटलांनी आज कवठेमहांकाळ येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आ. सुमनताई पाटील, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार गोरे, अनिता सगरे, उपअधीक्षक नवले, सभापती विकास हाक्के, छायाताई पाटील उपस्थित होत्या. सांगली जिल्ह्यात वयवर्षं ४५वरील नागरिकांचे सुमारे ४७ % लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीचा पुरवठा वाढल्यावर लसीकरण केंद्रे, तसेच मनुष्यबळ वाढविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हायवेच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी असे आदेश दिले. कवठेमहांकाळ शहरातील जनतेने घेतलेला कर्फ्युचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. हा निर्णय स्वयंस्फूर्तीने प्रत्येक तालुका स्तरावर स्थानिक प्रशासनाने घ्यावा जेणेकरून कोरोनाच्या साखळी तोडण्यात आपण यशस्वी होऊ अशा सूचना जयंत पाटलांनी दिल्या आहेत.

First Published on: May 1, 2021 8:12 PM
Exit mobile version