बीडीडी रहिवाशांना स्टॅम्प ड्यूटी फक्त १ हजार रुपये, कॅबिनेटचा निर्णय

बीडीडी रहिवाशांना स्टॅम्प ड्यूटी फक्त १ हजार रुपये, कॅबिनेटचा निर्णय

बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या सदनिकांच्या स्टॅम्प ड्युटीचे मुद्रांक १००० रुपये असणार असून ही रक्कम म्हाडातर्फे भरला जाणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीडीडी नागरिकांच्या सदनिकांची स्टॅम्प ड्युटी म्हाडा भरणार असल्यामुळे याचा अतिरिक्त भार हा म्हाडावर पडणार आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांवर मुद्रांक शुल्काचा बोजा पडणार नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच राज्य सरकराने बीडीडी चाळकरांसाठी मोठी सूट दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी १००० हजार रुपयाची स्टॅम्प ड्यूटी बीडीडी चाळकरांसाठी ठरवण्यात आली असून ती म्हाडा देणार असल्याचे जाहीर केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, सदनिकेमागे महसूलात तूट येत आहे. पण खासकरुन बीडीडीच्या रहिवाशांना सूट म्हणून या प्रकल्पात त्या रुमची/ सदनिकेची नोंदणी १००० रुपयात करण्या येणार आहे. याचा अर्थ रहिवाशांना खात्री पटेल की सरकार अतिशय गांभीर्याने पुढे चाललं आहे. आणि काम गतीमान आहे. २२० कोटीचा भार येणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मुंबईचा विकास व्हावा हाच हेतू

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, ही म्हाडाची जमीन नाही ही सरकारची जमीन आहे. हा स्पेशल प्रोजेक्ट म्हणून काढला आहे. यातील एकच चाळ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आहे. उर्वरित सर्व चाळी या आदित्य ठाकेर यांच्या मतदारसंघात येत नाही. केवळ चाळीत राहणाऱ्या नागरिकांना घरं मिळावं त्याच्यातून मुंबईचा विकास व्हावा या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आला असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

म्हाडाच्या ५६ वसाहती मुंबईत आहेत तेथे राहत असलेल्या नागरिकांना विशेष योजना आणण्यात येणार आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांना करण्यात आला आहे. यावर त्यांनी म्हटलं आहे की, सध्या वेगळ्या प्लॅनिंगच्या भूमिकेत आहोत. पुढील कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा होणार आहे. तेव्हा समजेल की आम्ही काय करतो आहे. म्हाडाला या सगळ्या वसाहती डेव्हलप करणं अशक्य गोष्ट आहे. यामुळे आमच्यासोबत कोणालातरी घेऊन भागीदारीत करण्याचा विचार आहे. त्याच्यातून निश्चित तिथं राहणाऱ्या नागरिकांना फायदा होईल.

भाजपवर निशाणा

खरंतर सांगायचे झाले तर भाजपकडून अपिपक्वता दिसत आहे. हा फार मोठा खेळ नव्हता मात्र भाजपची मानसिकता नव्हती. आम्ही काय जादूची कांडी फिरवली नाही. ज्या मागण्या होत्या त्याचा अभ्यास करुन प्रत्येक गटाशी चर्चा केली आहे. नायगावला बाजूला राजू वाघमारे बसले होते. तेच या प्रकल्पाचे मोठे विरोधक होते. दरवेळी विरोधकांना बाजूला बसवून पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांच्या मनाचे समाधन म्हणून यामुळे राजकीय आरोप होत असतात अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पोलिसांच्या पत्नींनी स्वतःहून स्वागत केलं होते. आम्ही कोणाला बोलावले नव्हते. त्यांच्या डोळ्या दिसणारा आनंद हा बरेच काही सांगून जातो असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंनी मानले आभार

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत बीडीडी चाळीबाबात घेतलेल्या निर्णयावर मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सदनिकांच्या करारनाम्याचे मुद्रांक शुल्क नाममात्र १००० रुपये इतके करून ते म्हाडातर्फे भरले जाईल, असा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे इथल्या रहिवाशांवर मुद्रांक शुल्काचा बोजा पडणार नाही. आश्वासनांच्या गर्दीत अडकलेला हा प्रकल्प महाविकास आघाडी प्रत्येक पावलासह वचनपूर्तीकडे नेत आहे. यामुळे हा निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाचे आभार आदित्य ठाकरे यांनी मानले आहेत.

First Published on: August 18, 2021 6:11 PM
Exit mobile version