बेटी बचाव पण ती मुस्लिम म्हणून बेटी हटाव, हा भाजपचा अजेंडा असल्याची जितेंद्र आव्हाडांची टीका

बेटी बचाव पण ती मुस्लिम म्हणून बेटी हटाव, हा भाजपचा अजेंडा असल्याची जितेंद्र आव्हाडांची टीका

बेटी बचाव पण ती मुस्लिम म्हणून बेटी हटाव, हा भाजपचा अजेंडा असल्याची जितेंद्र आव्हाडांची टीका

कर्नाटकात (Karnataka) महाविद्यालयातील विद्यार्थीनींना हिजाब घातल्यामुळे शाळेत बसण्याची परवानगी दिली नाही. हा प्रकार या राज्यात कर्नाटकात दुसऱ्यांदा घडला आहे. कुंदापूरमधील भांडारकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थीनींना आडवण्यात आले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांनी संताप व्यक्त केला आहे. यांना तोकडे कपडे आणि फाटक्या जिन्सवाल्या मुली चालत नाहीत. तसेच जर मुस्लिम मुलगी असेल तर बेटी हटाव असा यांचा अजेंडा असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकातील विद्यार्थीनींचा व्हिडिओ ट्विट करुन कर्नाटक सरकारवर संताप निशाणा साधला आहे. आव्हाडांनी लगातार दोन ट्विट करुन कर्नाटक सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेबल फाटकी जीन्स घालणार्‍या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरुनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान दुसऱ्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकातील भांडारकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थीनींना आडवण्यात आले आहे. तो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणालेत की, बेटी बचाओ, बेटी पढाओ पण जर ती मुस्लिम असेल तर बेटी हटाओ असा यांचा अजेंडा आहे.

काय आहे प्रकरण ?

कर्नाटकातील महाविद्यालयातील हिजाब घातलेल्या मुलींना शाळेत प्रवेश देण्यात आला नाही. विद्यार्थीनींनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे हिजाब घालून प्रवेश देण्याची विनंती केली. बुधवारी या प्रकरणाची सुरुवात झाली आहे. जेव्हा महाविद्यालयात १०० मुले भगवी शॉल परिधान करुन आले. कॉलेज प्रशासनाने कुंडापुर आमदार हलदी श्रीनिवास शेट्टीसोबत बैठक झाली आणि असा निर्णय़ घेण्यात आला की, विद्यार्थ्यांना आता समान नियमांचे पालन करावे लागणार परंतु आपल्या मतावर ठाम राहणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत प्रवेश देण्यात आला नाही.


हेही वाचा :  नितेश राणेंविरोधातील कारवाई राजकीय सूडबुद्धीने नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

First Published on: February 4, 2022 11:27 AM
Exit mobile version