घरताज्या घडामोडीनितेश राणेंविरोधातील कारवाई राजकीय सूडबुद्धीने नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

नितेश राणेंविरोधातील कारवाई राजकीय सूडबुद्धीने नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

Subscribe

सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्टावर सरकारचा दबाव आणि नियंत्रण असत नाही. राणे सर्वोच्च न्यायालयात जाऊन आले आहेत. यामुळे त्यांचे सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करणं अयोग्य आहे. त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीवर करण्यात येत आहे. परंतु ही कारवाई सुबद्धीने करण्यात येत नाही असे स्पष्टीकरण शिवसने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. कायद्याचे राज्य आहे. कायद्यापुढे सगळे समान असतात असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे. तसेच विरोधकांच्या टीकेला आम्ही महत्त्व देत नाही परंतु यामुळे विरोधकांच्या प्रतीमेला तडा जात असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप आमदार नितेश राणेंविरोधातील कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणेंविरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय? असा प्रश्न संजय राऊतांना करण्यात आला होता. यावेळी राऊत म्हणाले, मला असं वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी कायद्याचे राज्य आहे. काद्यापुढे सगळे समान असतात मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती असतील, आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करतो. सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्टावर सरकारचा दबाव आणि नियंत्रण असत नाही. राणे सर्वोच्च न्यायालयात जाऊन आले आहेत. यामुळे त्यांचे सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करणं अयोग्य आहे. त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

नक्की दाऊ पिऊन कोण बोलतंय…

बंडातात्या कराडकर यांनी राजकीय नेत्यांविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांना बंडातात्यांबाबत विचारण्यात आले होते. नक्की दाऊ पिऊन कोण बोलतंय… हे पाहावं लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

गोव्यात उर्मिला मातोंडकर प्रचार करणार

महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात ज्या पद्धतीची रणधुमाळी आपण पाहतो तशी गोव्यात दिसणार नाही. शिवसेना या वेळी प्रथम ११ जागा लढत आहेत. शिवसेना यापूर्वी गोव्यात लढली परंतु २ किंवा ३ जागांवर लढली आहे. युती करुन निवडणूक लढवण्यात आली होती. आता राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवत आहोत. उत्पल पर्रिकरांविरोधातील उमेदवारी मागे घेतली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे येणार आहेत. उर्मिला मातोंडकर यासुद्धा शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ‘त्या’ विधानाप्रकरणी बंडातात्या कराडकरांविरोधात गुन्हा दाखल; महिला आयोगाने धाडली नोटीस

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -