१० वी पास आहात?, बँक ऑफ इंडियाच्या सरकारी नोकरीसाठी करा अर्ज!

१० वी पास आहात?, बँक ऑफ इंडियाच्या सरकारी नोकरीसाठी करा अर्ज!

नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही एखाद्या बँकेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते. खरं तर, ऑफिस असिस्टंट, फॅकल्टी मेंबर आणि अटेंडंट या पदावर बँक ऑफ इंडियाची पदे रिक्त आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांना अर्ज फॉर्म ZO.Kolhapur@bankofindia.co.in या मेल आयडीवर पाठवावा लागेल. हा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना त्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे देखील जोडावी लागतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. म्हणून, अर्ज करू इच्छित सर्व उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करावेत. ही भरती कोल्हापुर करता निघाली आहे.

बँकेने घेतलेल्या या भरतींबद्दल एक खास गोष्ट म्हणजे पदवी घेतलेले तरुणही अर्ज करू शकतात, जसे की उमेदवारास ऑफिस असिस्टंट पदासाठी पदवीधर असण्याबरोबरच अकाऊंटचे सामान्य ज्ञानही असले पाहिजे. त्याच वेळी, फॅकल्टी मेंबर म्हणून, उमेदवाराकडे व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय अटेंडंट पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराने दहावी उत्तीर्ण केलेली असावी. या व्यतिरिक्त त्यांना हिंदी आणि इंग्रजी चांगले लिहीता येणे आवश्यक आहे.

असे असावे वय

ऑफिस असिस्टंट पदावर अर्ज करणारे उमेदवार किमान १८ वर्षे व जास्तीत जास्त ४५ वर्षे वयाचे असावेत. त्याचबरोबर, फॅकल्टी मेंबर पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे किमान वय २५ आणि जास्तीत जास्त वय ६५ वर्षे असावे. याशिवाय अटेंडंट पदावर अर्ज केलेल्या उमेदवाराचे कमाल वय ६५ वर्षे असावे.

भरती असलेल्या पदांचे तपशील

इतका मिळणार पगार

अशी होणार निवड

ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे असेल. त्याचबरोबर, फॅकल्टी मेंबर या पदासाठी लेखी परीक्षा, मुलाखत आणि प्रेझेन्टेशनद्वारे निश्चित केले जाईल. त्याचबरोबर, अटेंडंट पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल.


३०० हिंदूंनी बजावले मुस्लीम रुग्णांसाठी रक्तदानाचे कर्तव्य
First Published on: May 25, 2020 9:00 AM
Exit mobile version