जुहीच्या 5 जी सुनावणीतच वाजलं ‘घुंगट की आड से दिलबर का’, मग…

जुहीच्या 5 जी सुनावणीतच वाजलं ‘घुंगट की आड से दिलबर का’, मग…

बॉलिवुड अभिनेत्री जुही चावलाने ५ जी टेक्नॉलॉजी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच एक प्रकार सुनावणी दरम्यान समोर आला. जुहीने या सुनावणीची व्हर्च्युअल लिंक तिच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये शेअर केली होती. पण या लिंकवरूनच एका व्यक्तीने सुनावणीमध्ये सहभागी होत चुही चावलाची गाणी गायला सुरूवात केली. सुरूवातीला काय प्रकार आहे हे कुणालाच कळत नव्हते. पण या प्रकारामुळे कोर्टाच्या सुनावणीत मात्र अडथळा निर्माण झाला. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात लोक या सुनावणीसाठी ऑनलाईन हजर होते. त्यामुळे नेमक्या कोणत्या व्यक्तीकडून हा प्रकार सुरू आहे हे लक्षात येईना. कोर्टात ५ जी तंत्रज्ञानाविरोधात सुनावणी सुरू असतानाच एका व्यक्तीने चुही चावलाच्या चित्रपटातील गाणी गायला सुरूवात केल्याने या ऑनलाईन सुनावणीत व्यत्यय निर्माण झाला.

सुनावणी दरम्यान गाण एकायला येत आहे ही बाब कोर्टाच्या लक्षात येताच कोर्टाने तत्काळ त्या गाण गाणाऱ्या व्यक्तीला समज देत, गप्प रहायला सांगितले. सुनावणीत व्यत्यय आणणाऱ्या लोकांना शोधून त्या व्यक्तीविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची नोटीस पाठवण्याचे आदेशही कोर्टाकडून यावेळी देण्यात आले. या व्यक्तीच्या गाण्याने साऱ्यांचेच लक्ष वेधले, जुहीच्या चित्रपटातील घूंघट की आड से दिलबलर का हे गाण त्याने पहिल्यांदा गाईले. त्यापाठोपाठच आणखी चित्रपटाची गाणीही त्याने यावेळी गायली. पण या गाण्यांमुळे कोर्टाच्या सुनावणीत अडथळा निर्माण झाला. या गाण्यांमुळे कोर्टाचे कामकाज काही मिनिटांसाठी ठप्प झाले. त्यामुळेच कोर्टाने या व्यक्तीला आवाज म्यूट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कोर्टाने सुनावणी पुन्हा सुरू झाली.

तसेच जुही चावलाच्या सुनावणीत कोर्टाने विचारणा केली की, सरकारला जाब न विचारताच हा विषय थेट कोर्टात आणण्याचे कारण काय ? कोर्टाने जुही चावलाला या संपुर्ण प्रकरणात संक्षिप्त नोट सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जुहीच्या वकिलांकडून दीड पानाची नोट यावेळी वाचून दाखवण्यात आली. ही संपुर्ण सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान कोर्टाच्या नाराजीनंतर जुही चावलाने ट्विटर आणि इंस्टाग्रामवरूनही लिंक काढून टाकली आहे.


 

First Published on: June 2, 2021 7:22 PM
Exit mobile version