बाबा घरी चलाना; शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या कैलास पाटलांना लेकीची भावनिक साद

बाबा घरी चलाना; शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या कैलास पाटलांना लेकीची भावनिक साद

राज्य सरकारकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे थकीत अनुदान मिळावे म्हणून मागील सहा दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील बेमुदत उपोषणाला बसले होते. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला उस्मानाबादकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर कैलास पाटील यांनी उपोषण अखेर मागे घेतले आहे. दरम्यान आमदार कैलास पाटील यांची प्रकृती खालावल्याने आज त्यांची मुलगी आणि पुतणी त्यांना पाहण्यासाठी आंदोलनास्थळी आले होते. या दोघींमुळे वातावरण काही वेळ भावनिक झाल्याचे दिसले.

शेतकऱ्यांना नुकसाना भरपाई मिळावी यासाठी आमदार कैलास पाटील बेमुदत उपोषणासाठी बसले होते. यावेळी उपोषणा स्थळी अचानक त्यांची मुलगी आराध्या आणि पुतणी राजेश्वरी आल्या, यावेळी मुलीकडून वडिलांना घरी घेऊन जाण्यासाठी विनवणी सुरु होती. मुलगी आणि बापाचे नाते किती घट्ट असते हे यावेळी पाहायला मिळाले, उपोषणातून घरी चलाना असे म्हणत या दोघी अनेक वेळा आमदार कैलास पाटलांचा हात ओढत तरी कधी गळ्यात पडून गालावर पप्पी घेत होत्या.

ग्रामीण भागातूनही अनेक महिला कैलास पाटील यांना भेटत अश्रू ढाळत आंदोलन मागे घेण्यास सांगत आहेत मात्र ते आंदोलनावर ठाम होते. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजूत काढताच त्यांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्यानंतर कैलास पाटील यांनी आंदोलन मागे घेतले आहे.


कोरोना विषाणू हवेतून पसरतो, जागतिक आरोग्य संघटनेनेही केलं मान्य

First Published on: October 30, 2022 3:07 PM
Exit mobile version