Karnataka Election 2023 : कॉंग्रेसला बजरंगबली पावला! १३६ जागांवर दणदणीत विजय

Karnataka Election 2023 : कॉंग्रेसला बजरंगबली पावला! १३६ जागांवर दणदणीत विजय

 

कर्नाटकाः कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या सर्व २२४ जागांचे निकाल जाहिर झाले आहेत. यामध्ये कॉंग्रेसला १३६ जागा मिळाल्या आहेत. भाजपला ६५, जनता दल सेक्युलरला १९, कल्याणा राज्य प्रगती पक्ष १ आणि सर्वोदय कर्नाटका पक्षाचा १ उमेदवार निवडून आला आहे. दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. दोन दशकानंतर कॉंग्रेसच्या पदरी कर्नाटकची एकहाती सत्ता आली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही. कर्नाटक निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच The Kerala Story चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केले तर कॉंग्रेसने या चित्रपटावर टीका केली. कॉंग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात बजरंग दलवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले. त्यावरुनही पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती.

शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहिर झाला. एक्झिट पोलने कॉंग्रेसला स्पष्ट बहुमताचा कौल दिला होता. त्यानुसार सकाळपासूनच कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर होते. भाजपची कासवगतीने सुरुवात झाली. हळूहळू करत कॉंग्रेसने शंभरचा आकडा पार केला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच कॉंग्रेसची कर्नाटकमध्ये हाती सत्ता आल्याचे स्पष्ट झाले. अंतिम निकालात कॉंग्रेसला १३६ तर भाजपला ६५ जागांवर विजय मिळाला.

कॉंग्रेसच्या विजयाचे खरे मानकरी कर्नाटकी जनता आहे. त्यामुळे कर्नाटकी जनतेचे आभार आणि अभिनंदन. कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांचाही हा विजय आहे. त्यांचेही अभिनंदन. गरीब ताकदीने धनाढ्य शक्तीला हरवले आहे. नफरत की बाजार बंद और मोहब्बत की दुकान शुरू, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली.

या विजयाबद्दल पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ट्वीट करुन कॉंग्रेसचे अभिनंदन केले आहे. कॉंग्रेसने आता जनतेची कामे करावीत, असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसला दिला आहे.

First Published on: May 13, 2023 9:33 PM
Exit mobile version