कसब्यात हेमंत रासनेंच्या रॅलीत टिळक गैरहजर; भाजपाने तिकीट न दिल्याच्या नाराजीची चर्चा

कसब्यात हेमंत रासनेंच्या रॅलीत टिळक गैरहजर; भाजपाने तिकीट न दिल्याच्या नाराजीची चर्चा

उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज झाले. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

Kasba Bypoll Election : एकीकडे नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेसवर केलेल्या आरोपानंतर कॉंग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. तर दुसरीकडे पुण्यात चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणूकीत भाजपमध्ये नाराजीचा सूर ऐकू येऊ लागलाय. भाजपनं कसब्यातून टिळकांच्या घरात तिकीट न देता, हेमंत रासनेंना तिकीट दिलंय. उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज झाले. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कसबा गणपती मंदिरासमोर भाजपकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. कसबा गणपती मंदिर ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत मोठी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित दिसून येत आहेत. यात चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत पुण्यातील स्थानिक नेते सुद्धा दिसून आले. परंतू या पदयात्रेत शैलेश टिळक मात्र कुठेही दिसून आले नाहीत. टिळक कुटुंबीयांचे कोणीच सदस्य या पदयात्रेत दिसले नाहीत. त्यामुळे टिळकांच्या घरात तिकीट न दिल्याने शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची नाराजी उघडउघड दिसून आली आहे.

पाहा व्हि़डीओ :

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला मोठी कसरत करावी लागली. शैलेश टिळक यांचा पत्ता कट करण्यात आल्यानं या निवडणूकीत ब्राम्हण समाजाची नाराजी मतांतून दिसून येईल का? आणि भाजपच्या निकालावर याचे काय परिणाम होतात हे पाहणं रंजक ठरणार आल्याचं बोललं जात आहे. टिळक कुटुंबीय तसंच पुण्यातील प्रसिद्ध टिळकवाडा आता भाजप विरोधी भूमिका घेणार का? काँग्रेसला पाठिंबा देणार का, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

First Published on: February 6, 2023 1:09 PM
Exit mobile version