केतकी चितळेला तृप्ती देसाईंचा पाठिंबा, म्हणाल्या …

केतकी चितळेला तृप्ती देसाईंचा पाठिंबा, म्हणाल्या …

Ketki Chitale was supported by Trupti Desai

केतकी चितळेने खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केली होती. यानंतर तिच्यावर विविध राजकीय पक्षांनी टीका केली. तीच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून सध्या ती ठाणे पोलिसांच्या कोठडीत आहे. मात्र, तीचे समर्थन विविध राजकीय संघटनांचे राजकीय नेते करत आहेत. तीच्यावर होणाऱ्या कारवाइला भुमाता ब्रीगेडच्या तृप्ती देसाईंनी विरोध केला आहे.

जेव्हा केतकी चितळेनी फेसबुकवर पोस्ट केली तेव्हा त्या आक्षेपार्ह पोस्टमध्ये तीने पवार असा उल्लेख केला होता. शरद पवार असे कोठेही पूर्ण नाव लिहिलेले नाही. त्यामुळे न्यायालयात ही केस टिकू शकत नाही. केतकी चितळेने जर जाणून बूजून पोस्ट केली असेल तर तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे का दाखल केले जात आहेत? तिने आक्षेपार्ह पोस्ट केली. पण तिला ट्रोल करणारे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते वेगळ्या पद्धतीने तिला अश्लील भाषेत ट्रोल करत आहेत. वेगवेगळे अश्लील फोटो व्हायरल करत आहेत. त्यांच्यावर ही कलमे का लावली जात नाहीत? तिच्यावर एका आक्षेपार्ह पोस्टसाठी 13 ठिकाणी गुन्हे का दाखल होतात. आपण महाराष्ट्रात आणि भारतात राहतो. ही लोकशाही आहे. मला वाटते तालीबानी देशात जिथे हुकुमशाही आहे, तिथे असे गुन्हे घडत होत असतील. आपल्या महाराष्ट्रात हे कधीच घडलेले नाही, असे घडत असेल तर लोकशाही संपत चालली असून हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

कारवाई सगळ्यांवर झाली पाहिजे –

तिने लिहिलेल्या आक्षेपार्ह पोस्टला माझे समर्थन नाही. तिच्यावर कायदेशीर कारवाई करा. मात्र, घाणेरडे ट्रोलींग करू नका. ति एक महिला आहे म्हणून जबरजस्ती कोणतीही कलमे लावली जात आहे. तुमच्या कडे गृहखाते आहे म्हणून कायद्याचा गैरवापर करताय. एखाद्या वरिष्ठ नेत्यावर पोस्ट टाकली म्हणून अटक होते. करायचीच असेल तर सगळ्यांवर कारवाई करावी लागेल. केतकी चितळेला टार्गेट करू नका. तिला टार्गेट करणारे आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

सदाभऊ खोत यांचे समर्थन –

केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असे सदाभाऊ खोत म्हणाले. स्वतःवर टीका केली की सगळे आठवते. सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका करताना तुमची नैतिकता कोठे गेली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर वेगळा शब्द वापरत टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती. अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाला टार्गेट करताच त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

First Published on: May 16, 2022 6:03 PM
Exit mobile version