पुण्याच्या खडकवासला धरणामध्ये ९ मुली बुडाल्या; ७ मुलींना बाहेर काढण्यात यश तर २ मुलींचा मृत्यू

पुण्याच्या खडकवासला धरणामध्ये ९ मुली बुडाल्या; ७ मुलींना बाहेर काढण्यात यश तर २ मुलींचा मृत्यू

मुंबई | पुण्याच्या खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) ९ मुली बुडाल्या आहेत तर, ९ पैकी ७ मुलींना (girl) धरणातून बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु, दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. खडकवासल्या धरणात हवेली गावच्या हद्दीत पोहोण्यासाठी ९ मुली गेल्या होत्या. पण, स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे ७ मुलींना वाचविण्यात यश आले आहे. या घटनास्थळी हवेली पोलीस दाखल झाले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला सुद्धा दाखल झाले आहे.

दरम्यान, कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहोण्यासाठी गेल्या होत्या. या मुलींना पाण्याचा अंदाज न आल्याने ९ मुली पाण्यात बुडल्या. तेव्हा दशक्रिया विधीसाठी आलेल्या काही स्थानिकांच्या प्रसंगावधानामुले मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. स्थानिकांनी ९ पैकी ७ मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. परंतु, अद्यापही दोन मुलींचा शोध लागला नाही.

यासंदर्भात स्थानिकांनी हवेली पोलीस ठाण्यात माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व पोलीस हवालदार दिनेश कोळेकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. या मुलींचा शोध घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण दाखल झाले आहेत.

 

 

First Published on: May 15, 2023 10:43 AM
Exit mobile version