“खोके…खोके… ओरडणाऱ्यांकडे कंटेनर”, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

“खोके…खोके… ओरडणाऱ्यांकडे कंटेनर”, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

पनवेल : “खोके खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर आहेत”, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. आज राज ठाकरेंचा पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे मनसे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी सृमद्धी महामार्गा, मुंबई-गोवा महामार्ग, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नाणार प्रकल्प, उद्धव ठाकरे आदी मुद्यांवर निशाणा साधला.

राज ठाकरे म्हणाले, “हे जे आज एकमेंकांवर ओरडताता ना खोके खोके…जे खोके खोके ओरडत आहेत ना…त्यांच्याकडे कंटेनर आहेत, अशी टीका राज ठाकरेंनी केल्यावर उपस्थितींमध्ये एकच हशा पिकला. राज ठाकरे पुढे म्हणाले, यांनी तर कोवीडपण नाही सोडला आणि हेच तुमच्याकडे निवडणुकीच्या तोंडावरती. आणि प्रत्येक वेळा येईचे आणि बाळासाहेबांचे नाव पुढे करायचे. आम्ही लगेच भावनिक होऊन मतदान करणार. कोणाला मतदान करतोय, कोण सत्ता राबवित होते याचा काही विचार तर करणार आहा का?, असा सवाल राज ठाकरेंनी राज्यातील जनतेला केला आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : भाजपसोबत येणारे गाडीत झोपून जातात, राज ठाकरेंचा अजित पवारांना खोचक टोला

पुणे बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

राज ठाकरेंनी पुणेसंदर्भात बोलताना म्हणाले “मी अनेक वेगळे सांगितले की, मुंबई बर्बाद होण्यास एक मोठा काळ लोटला होता. पण पुणे बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही. मी हेच गेल्या 20 ते 25 वर्षापासून बोलतोय. कारण, पुण्यात कोणत्या गोष्टींची आखणी नाही. आमच्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्ट नाही. आमच्याकडे फक्त डेवलपमेंट प्लान येतो. आज पुण्याचे पाच पाच पुणे झालेत. जरा तुम्ही पुण्याचा अंदाज घ्या, तुमच्या लक्षात येईल. गुदमरलेला कोण आहे. गुदमरलेला मराठी माणूस आहे. कोण येतोय, कोण जातयो, कशाचा पत्ता नाही. आपल्या कोकण आणि महाराष्ट्रात कोणी ही येते आणि जमीन घेते.”

First Published on: August 16, 2023 1:40 PM
Exit mobile version