Kiran Mane: मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, राजकारणात जाण्याची माझी इच्छा नाही – किरण माने

Kiran Mane:  मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, राजकारणात जाण्याची माझी इच्छा नाही – किरण माने

Kiran Mane: मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, राजकारणात जाण्याची माझी इच्छा नाही - किरण माने

राजकीय पोस्ट केल्याने स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले. किरण मानेंनी केलेल्या या आरोपानंतर हा वाद चांगलाच रंगला. दरम्यान आपली बाजू मांडण्यासाठी अभिनेते किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील किरण माने आणि स्टार प्रवाहचे क्रिएटिव्ह हेट सतीश राजवाडे यांच्यासोबत बैठक घेतली होती. या भेटींनंतर किरण माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरण मानेंनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.

यावेळी किरण माने म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी माझा काहीही संबंध नाही. शरद पवार सांकृतिक क्षेत्राची माहिती असलेले, सांस्कृती क्षेत्राची जाण असणारे एकमेव नेते आहेत. बुद्धिमान विचारी आणि संयमी नेते आहेत. तटस्थपणे ते सगळं ऐकून घेतात. म्हणून मी माझी  बाजू त्यांना सांगण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे माझ्या ओळखीतल्या लोकांनी शरद पवारांची माझ्यासाठी वेळ घेतली होती. मी त्यांच्याकडे वेळ मागायला गेलो नव्हतो. त्यांनी मला स्वत: फोन करुन बोलावले होते, असे किरण माने यांनी सांगितले.

राजकारणात जाण्याची अजिबात इच्छा नाही

किरण माने  राजकारणात जाणार असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी म्हटले, राष्ट्रवादी काँग्रेसशी माझा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादीच नाही तर माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. मला माझ्या अभिनय क्षेत्रात रमायला आवडत. तुकारामांच्या निरुपणाचे आजच्या काळात संदर्भ लावून मांडण्यात आनंद वाटतो. इथून पुढे कोणतेही काम मिळाले नाही तर स्वत: करु काही तरी. नागराज मंजूळे एक सिनेमा करतात आणि सगळ्या निर्मात्यांना मागे टाकताता आम्ही देखील त्यांच्यासारखेच काही तरी करू शकतो. त्यामुळे राजकारणात जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही.

अतुल लोंढे माझ्या बाजूने

मी शरद पवारांकडे गेलो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या बाजूने आहे असे नाही. काँग्रेसचे अतुल लोंढे देखील माझ्या बाजूने आहेत. अतुल लोंढे म्हणतात हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. ते काँग्रेसचे आहेत तरीही ते माझ्या पाठीशी आहेत. मी कोणत्याही पक्षाचा नाही. पवारांना भेटल्यानंतर मला वाटले की काही तरी न्यान मिळेल, म्हणून गेलो होतो. बाळासाहेब थोरातांनी देखील मी भेटलो. शिवसेनेतील अनेक नेत्यांनी मला फोन केले होते.  मी अनेक राजकीय राजकीय व्यक्तींवर लिहितो त्यामुळे मी कोणत्या एका पक्षाचा आहे असे अनेकांना वाटत असेल मात्र मी कोणत्याही पक्षाचा नाही, असे किरण माने म्हणाले.


हेही वाचा –  Kiran Mane: किरण मानेंची पॅनोरमा प्रॉडक्शन हाऊस विरोधात कायदेशीर कारवाईची याचिका, ५…

First Published on: February 4, 2022 7:08 PM
Exit mobile version