अनिल देशमुख यांना ईडी चौकशीला सामोरे जाऊन ‘जेल’मध्ये जाव लागणार, किरीट सोमैय्यांचा दावा

अनिल देशमुख यांना ईडी चौकशीला सामोरे जाऊन ‘जेल’मध्ये जाव लागणार, किरीट सोमैय्यांचा दावा

राष्ट्रवादी नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ४ कोटी २० लाख संपत्तीवर ईडीने कारवाई करुन जप्त केली आहे. याचाच धागा पकडून माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागणार असा दावा केला आहे. किरीट सोमैय्या सत्ताधारी नेत्यांच्या आर्थिक गैरव्यवहारावरुन टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहत नाहीत परंतु त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आणि तुरुंगातही जावं लागणार अशी खात्री आहे. किरीस सोमैय्या यांनी म्हटलं आहे.

माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विट करत एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये सोमैय्या यांनी म्हटलं आहे की, अनिल देशमुख यांनी १०० कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. नागपूर, मुंबई,उरण, जेएनपीटी येथे जमीन घेणे आपला पैसा चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे याचा हिशोब आता ईडी मागत आहे. अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीसाठी समोर यावं लागणार आहे. १०० कोटीचा आर्थिक घोटाळा आणि अवैध संपत्तीमुळे जेलमध्ये जावं लागणार असा दावा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर ईडीची कारवाई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. एकूण ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्य मुंबई वरळीमधील सुखदा या इमारतीमधील पत्नीच्या नावे असलेला एक फ्लॅट सील केला असून या फ्लॅटची एकूण किंमत १ कोटी ५४ लाख रुपये आहे. तसेच उरण येथील २ कोटी ६७ लाख रुपये किंमतीची जमीन जप्त केली आहे. तसेच नागपूर येथे असलेली मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.

First Published on: July 16, 2021 6:02 PM
Exit mobile version