ट्वीन टॉवरचा प्रयोग कोकणातही करा, किरीट सोमय्यांचा सरकारला सल्ला

ट्वीन टॉवरचा प्रयोग कोकणातही करा, किरीट सोमय्यांचा सरकारला सल्ला

KIRIT SOMAIYA

मुंबई – नोएडा येथील ट्वीन टॉवर पडले, अनिल परब यांचे दापोली येथील ट्वीन रिसॉर्टही पडणार असं ट्वीट भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्या आधी सकाळीच त्यांनी ट्वीन टॉवरचा प्रयोग कोकणात दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यासाठी करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या अनिल परब यांचं रिसॉर्ट पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, हे यातून सिद्ध होतंय.


माजी मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब सध्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आहेत. अनिल परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट लवकरच पडणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानुसार, ट्वीन टॉवर पाडण्यासाठी ज्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, तसंच तंत्रज्ञान अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी करा असा सल्ला किरीट सोमय्या यांनी सरकारला दिला आहे.

हेही वाचा – चलो दापोली रिसॉर्ट तोडो! अनिल परबांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी सोमय्यांचा दापोली दौरा

उद्या रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत दापोलीतील रिसॉर्ट कधी पाडायचा, त्यासाठी नियोजन कसं करायचं? रिसॉर्ट पाडायला कोणाला कंत्राट द्यावं यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, रिसॉर्ट पाडण्याचा खर्च महाराष्ट्र सरकारच्या अख्यारित येणाऱ्या महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथोरिटीकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे केली. ट्वीन टॉवर पाडण्यासाठी ज्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, तसेच तंत्रज्ञान अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी करावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.


राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे रिसॉर्टचे बांधकाम केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या रिसॉर्टचे बांधकाम करताना सीआरझेडचे उल्लंघन झाल्याचा सोमय्यांचा दावा आहे. तसेच रिसॉर्ट खरेदी करताना बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. याप्रकरणी सोमय्यांनी दापोली जिल्हाधिकारी प्रशासनासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि ईडीकडे तक्रार केली. तसेच साई रिसॉर्ट खरेदीसाठी परब यांनी कुठून पैसै आणला याचा तपास करणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले.

First Published on: August 28, 2022 1:56 PM
Exit mobile version